India Pakistan Tension : दहशतवाद, कट्टरतावाद या आणि अशा अनेक कारणांनी पेटलेल्या या युद्धजन्य परिस्थीनं सारा देश हादरला असतानाच सैन्यदलानं दिलेली देशसेवा पाहून प्रत्येकजण मनोमन कृतज्ञता व्यक्त करत आहे. प्रत्यक्षात ज्या कुटुंबातील व्यक्ती सैन्य सेवेत आहेत त्यांच्या जीवाला घोर लागून राहिला आहे कारण, देशसेवा त्याग मागते….गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावानं एक दाहक वास्तव समोर आणलं. संघर्ष अद्यापही पूर्णपणे निवळला नसला तरीही त्याला विराम मात्र मिळाला आहे. अशातच काही अशा सत्यघटना समोर येत आहे ज्यामुळं याच दहशतवादानं सामान्यांचा बळी घेतला.
बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री, तिच्या कुटुंबानंही या वेदना सहन केल्या. कारण त्यांनी त्यांचा आधारच गमावला होता. त्या आठवणी आजही मनात घालमेल करतात असंच ही अभिनेत्री सांगते. सीमाभागात तणाव वाढत असतानाच अनेक कलाकारांनी भारतीय सैन्यदलाला पाठींबा देणाऱ्या पोस्ट केल्या. पण, यामध्ये एका अशा अभिनेत्रीला विसरून चालणार नाही, जिनं वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी कारगिल युद्धादरम्यान सैन्याच्या सेवेत असणाऱ्या आणि युद्धभूमीवर गेलेल् वडिलांना गमावलं. देशासाठी लढणाऱ्यांच्या कुटुंबाला नेमकं काय काय सहन करावं लागतं हेच या अभिनेत्रीनं सांगितलं होतं.
2004 मध्ये एका म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून सिनेजगतातील कारकिर्दीची सुरुवात करणारी ही अभिनेत्री आहे निम्रत कौर. सैन्यदलाशी थेट संबंध असणाऱ्या अनेक कुटुंबापैकीच एक म्हणजे निम्रतचं कुटुंब. तिचे वडील मेजर भूपेंद्र सिंग भारतीय सैन्यदलात वरिष्ठ अधिकारी होते. काश्मीरमध्ये ते सेवेत रुजू होते. मात्र त्यांचं कुटुंब पटियालातच होतं, कारण काश्मीरमध्ये कुटुंबासाठी त्यांना सुरक्षित वातावरण दिसत नव्हतं. निम्रतनं सांगितल्यानुसार तिचे वडील एका दहशतवादी कटात फसले. एका मुलाखतीमध्ये निम्रतनं याची माहिती दिली होती. 1994 च्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये निम्रत तिच्या आईसोबत काश्मीरमध्ये सुट्टीसाठी गेली होती.
आईसोबत ती तिथं पोहोचली तेव्हा हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यंनी तिच्या वडिलांचं त्यांच्या सैन्यतळावरून अपहरण केल्याची हादरवणारी बातमी त्यांना मिळाली. 7 दिवसांनी त्यांना सेवेतून रजा देण्यात आली. हा संपूर्ण अनुभव निम्रतसाठी धक्कादायक ठरला.
वडिलांना सोडण्याच्या मोबदल्यात दहशतवाद्यांनी सरकापुढे काही अटी ठेवल्या होत्या. पण, सरकारनं त्या झुगारून लावल्यानं दहशतवाद्यांनी तिच्या वडिलांना जीवे मारलं. लहानग्या निम्रतच्या वडिलांचं पार्थिव दिल्लीला पाठवून देण्यात आलं आणि तिथंच तिनं वडिलांना शेवटचं डोळे भरून पाहिलं. जीवनातील सर्वात वेदनादायी प्रसंगांपैकी हाच तो पोटात खड्डा पाडणारा क्षण, असंच निम्रतनं सांगितलं.