Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऑस्ट्रेलियात परिणीतीचा देसी अंदाज...

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने एक व्हिडिओ शेअर केला.

ऑस्ट्रेलियात परिणीतीचा देसी अंदाज...

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ती ऑस्ट्रेलियात फिरताना दिसत आहे आणि गाणे देखील गात आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने म्हटले आहे की, असे अनेक व्हिडिओ आहेत जे शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे. परिणीती ऑस्ट्रेलिया टूरिझमची ब्रॅंड अॅम्बासेटर आहे. हा व्हिडिओ तिने ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंडमध्ये भ्रमण करताना बनवला आहे.

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलियाई महावाणिज्यदूत टोनी ह्यूबरने ‘फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया’(एफओए) बनवले होते. परिणीती एफओए पॅनलचा हिस्सा झालेली पहिली भारतीय महिला अंम्बेसेडर झाली. यापूर्वी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर आणि क्रिकेट कमेंटेटर हर्षा भोगले भारतीय ऑस्ट्रेलिया टूरिझमला प्रोत्साहित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. 

परिणीती ब्रॅंड अॅम्बासेटर झाल्यानंतरचा आनंद तिने व्यक्त केला. ती म्हणाली की, मला फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया साठी नियुक्त केल्याबद्दल मी खूप आनंदीत आहे. सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी ऑस्ट्रेलिया एक आवडीची जागा आहे. 

Read More