Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; कंगनाकडून अटकेची मागणी

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. 

अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; कंगनाकडून अटकेची मागणी

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अभिनेत्री कंगना रानौतच्या प्रश्नांचा सामना करणाऱ्या दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर हा आरोप केला असून ट्विटवर ही माहिती दिली आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली असल्याचं सांगत पायल घोषने नरेंद्र मोदींना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे. याबाबत सांगणं माझ्यासाठी नुकसानकारक असून माझी सुरक्षाही धोक्यात असल्याचं सांगत, तिने मदतीची विनंती केली आहे.

fallbacks

अनुराग कश्यपवरील आरोपांनंतर कंगनाने पायलच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. कंगनाने #MeToo हा हॅशटॅग वापरत, अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे. यापूर्वीही सुशांत प्रकरणावरुन कंगना आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळाला होता.

fallbacks

पायल घोषने केलेल्या आरोपांनंतर अनुराग कश्यपनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात केस दाखल केलेली नाही. परंतु राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पायलकडे याबाबत संपूर्ण माहिती मागितली आहे. ज्याद्वारे त्या या प्रकरणात कारवाई करु शकतील.

fallbacks

Read More