Prajakta Gaikwad Engagment : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा साखरपुडा नुकताच पार पडला. मागील अनेक महिन्यांपासून प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा होती. अखेर गुरुवारी प्राजक्ताने तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले असून यातून तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सुद्धा उघड केलं आहे. तसेच साखरपुड्यातील खास क्षण सुद्धा प्राजक्ताने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून यावर फॅन्स तिला भरभरून शुभेच्छा देत आहे.
प्राजक्ता गायकवाड ही मागील अनेक वर्षांपासून मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीमध्ये कार्यरत आहे. मात्र 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत तिने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची म्हणजेच महाराणी येसू बाईंची भूमिका केली होती. तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि भरभरून प्रेम दिलं. आता प्राजक्ताच्या नवऱ्याच्या बाबत सुद्धा एक खास योगायोग जुळून आला आहे. प्राजक्ता गायकवाड हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार तिच्या होणाऱ्या पतीचं नाव 'शंभूराज' असं आहे.
प्राजक्ताने साखरपुड्याच्या निमित्ताने लाल पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तर तिचा होणार नवरा शंभूराज याने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. प्राजक्ताने तिच्या ब्लाउजच्या मागे 'शंभूराज' हे नाव लिहिले होते. तर शंभूराजने त्याच्या सदऱ्यावर खिशाच्या बाजूला 'प्राजक्ता' असं नाव लिहीलं आहे.
1. प्राजक्ताने साखरपुड्यासाठी कोणता पोशाख परिधान केला होता?
प्राजक्ताने साखरपुड्यासाठी लाल-पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती, आणि तिच्या ब्लाउजच्या मागे 'शंभूराज' हे नाव लिहिले होते.
2. प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या पतीचे नाव काय आहे?
प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचे नाव शंभूराज आहे, ज्याचा उल्लेख तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून केला आहे
3. प्राजक्ता गायकवाडच्या करिअरबाबत काय माहिती आहे?
प्राजक्ता गायकवाड मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिने 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली, ज्यामुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. तसेच, तिने 'नांदा सौख्य भरे' आणि 'संत तुकाराम' यासारख्या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत