Marathi News> मनोरंजन
Advertisement

जय मल्हारsssss! मराठमोळ्या अभिनेत्रीनं जेजुरीत उचलली 42 किलोंची खंडा तलवार

शिवरायांवरील खरी भक्ती, अनुभवा खास क्षण

जय मल्हारsssss! मराठमोळ्या अभिनेत्रीनं जेजुरीत उचलली 42 किलोंची खंडा तलवार

मुंबई : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील राणी येसूबाई म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हीचे. प्राजक्ता गायकवाडने जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. प्राजक्ता एवढ्यावरच थांबली नाही तर तिने तब्बल 42 किलो वजनाची खंडा तलवार उचलली आहे. सध्या या फोटोची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. 

येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात तिने खंडोबांचं दर्शन घेतलं. प्राजक्ताने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

प्राजक्ताने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. मराठमोळी वाघिण, जिजाबाईंची लेक अशी प्रतिक्रिया देऊन कौतुक केलं आहे. 

प्राजक्ता गायकवाडने 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत येसूबाई यांची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने 'नांदा सौख्यभरे', 'संत तुकाराम' या मालिकेतही काम केलं आहे.

उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे. रोजच्या जीवनातील विविध घडामोडी प्राजक्ता चाहत्यांसोबत शेअर करत असते.

"आपल्या भोवती कोरोनाचा अंधार दाटला असला तरीदेखील घाबरू नका. स्वतः वर विश्वास ठेवा. जगाचा पोशिंदा असलेल्या त्या शेतकऱ्याकडे बघा. कितीही संकटं आली तरी तो कधीच थांबत नाही. म्हणूनच आपण जगू शकतो", असं कॅप्शन देत प्राजक्तानं हा फोटो शेअर केला आहे.

Read More