मुंबई : काही दिवसांपूर्वीच 'मनमधुडू 2' Manmadhudu 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. नागार्जुन अक्किनेनी आणि रकुलप्रीत सिंग यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही प्रेक्षकांचा आणि नेटकऱ्यांचा एक असाही वर्ग आहे, जो चित्रपटातील एका बोल्ड दृश्यामुळे वादाचा वाचा फोडताना दिसत आहे.
एखाद्या बोल्ड दृश्यामुळे वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावेळी Manmadhudu 2 संबंधी वाद रंगत आहे तो म्हणजे अभिनेत्री रकुलप्रीत सिंग हिच्या आणि एका महिला सहकलाकारामधील लीपलॉक सीन अर्थात चुंबनदृश्यामुळे.
मुख्य म्हणजे हा वाद काहीसा विचित्र आहे, कारण या एका दृश्यामुळे अभिनेत्री नव्हे, तर गायिका चिन्मयी श्रीपदा अनेकांच्याच निशाण्यावर आली आहे. चिन्मयीचा या वादाशी नेमका काय संबंध असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. Manmadhudu 2 मुळे चिन्मयी ट्रोल होण्याचं कारण म्हणजे, तिची या चित्रपटाविषयीची भूमिका.
Manmadhudu 2 या चित्रपटाचं दिग्दर्शन गायक चिन्मयीच्या पतीने म्हणजेच राहुल रविंद्रन याने केलं आहे.
साधारण महिनाभरापूर्वी संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'कबीर सिंग' या चित्रपटाच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या त्यांच्याच वक्तव्याची चिन्मयीकडून खिल्ली उडवण्यात आली होती. तिने शाहिद कपूरची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाती काही मुद्द्यांवर आक्षेप नोंदवला होता.
पण, 'कबीर सिंग'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी मात्र चित्रपटातील गोष्टी कशाप्रकारे योग्य आहेत हे स्पष्ट केलं होतं. त्यांना नेटकऱ्यांचाही पाठिंबा मिळाला होता. याच धर्तीवर आता ज्यावेळी आपल्या पतीच्या दिग्दर्शनात साकारलेल्या Manmadhudu 2 या चित्रपटात धुम्रपानाची दृश्य असताना आणि काही वादग्रस्त दृश्य असताना मात्र तिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे तिच्या याच दुटप्पी भूमिकेमुळे नेटकऱ्यांनी मोठ्या चतुराईने हीच बाब हेरत तिला धारेवर धरलं आहे.
What A Feminism mam @Chinmayi @Samanthaprabhu2
— Bang MEGA FAMILY Haters (@bangMEGAhaters) August 9, 2019
You are not deeply disturbed right??#Manmadhudu2 #Manmadhudu2fromToday pic.twitter.com/Dc5cFNOMdJ
#Manmadhudu2 #chinmayileaks #deeplydisturbing #WeSupportSandeepReddyVanga @Chinmayi are you sleeping now..pls tweet on this??? pic.twitter.com/mjYHC9DM98
— Welcome to my Kingdom! (@MELLEMPUDIS) August 7, 2019