Rambha Actress Comeback : दिग्गज अभिनेत्री रंभानं 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बंधन' आणि 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'क्योंकि.. मैं झूठ नहीं बोलता' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. तो एक काळ होता जेव्हा लोकप्रिय कलाकारांमध्ये रंभाचं नाव आहे. रंभानं 15 वर्षांची असताना मल्याळम चित्रपटातून डेब्यू केलं होतं. त्यात त्यानं विनीतसोबत ‘सरगम’ मध्ये काम केलं. तर 1992 मध्ये त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचवर्षी त्यांनी ‘सम्पाकुलम थाचन’ मध्ये अभिनय केला होता.
त्यानंतर 1993 मध्ये तेलुगू चित्रपट ‘आ ओक्काडु अदुसु’ मध्ये दिसली होती. रंभानं तमिळमध्ये ‘उझावन’ ते सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘उल्लाथाई अल्लिथा’, ‘सुंदर पुरुष’, ‘सेनगोट्टई’, वीआईपी, ‘अरुणाचलम’ आणि ‘कथाला कथाला’ सारख्या चित्रपटांमधून त्यांना लोकप्रियता मिळाली. ‘अझगिया लैला’ गाण्यातून त्यांना जगभरात खरी ओळख मिळाली. सगळ्यात शेवटी ‘पेन सिंगम’ या चित्रपटात रंभा दिसली होती. त्यानंतर 2010 मध्ये कन्नड उद्योजक इंद्रकुमार पद्मनाभन यांच्याशी लग्न केलं आणि परदेशात स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. रिपोर्ट्सनुसार, रंभा यांच्याकडे एकूण 2000 कोटींची संपत्ती आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी ‘मानदा मयिलाडा’ आणि ‘जोडी नंबर 1’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून भाग घेतला. 2017 मध्ये तिनं विजय टिव्हीवर ‘किंग ऑफ ज्युनियर’ या शोमध्ये परिक्षकाचं काम केलं. खरंतर, ती चित्रपटांपासून दूर राहते. आता अशी बातमी समोर येत आहे की रंभा विजय टिव्हीवर डान्स शो 'जोडी: आर यू रेडी' च्या नव्या सीझनमध्ये परिक्षक म्हणून कमबॅक करणार आहे. गेल्या सीझनमध्ये सॅन्डी, श्रीदेवी आणि मीना या परिक्षक होत्या. असं म्हटलं जातंय की रंभा मीना यांची जागा घेणार आहे.
तर सिल्व स्क्रीनवर कमबॅकविषयी देखील माहिती दिली आहे. नुकत्याच एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये फिल्ममेकर कलईपुली एस. थानूनं खुलासा केला की 'रंभा यांच्याकडे 2,000 कोटींची प्रॉपर्टी आहे. त्यांचा नवरा हेा मोठा बिझनेसमॅन आहे. त्यांनी माझ्याकडे एका चित्रपटासाठी संधी मागितली, मी त्यांना आश्वासन दिलं की मी एक चांगला प्रोजेक्ट त्यांना शोधून देईन.'
कॅनडामध्ये राहणारे इंद्रकुमार पद्मनाभन यांचे अनेक व्यवसाय आहेत. ते मॅजिक वुड्स या प्रसिद्ध गृह इंटीरियर कंपनीचे संचालक आहेत. याशिवाय, ते पाच कंपन्या चालवतात, ज्यात रंभा यांच्या नावाने एक आहे, ज्यापैकी काही चेन्नईमध्ये असल्याचं म्हटलं जातं.