Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुस्लिम कुटुंबात जन्म पण हिंदू नावामुळे मिळाली प्रसिद्धी, पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न करताच इंडस्ट्री सोडली

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जिचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला मात्र, तिला हिंदू नावाने ओळखले जाते. आज ती बॉलिवूडपासून दूर आहे. तुम्ही ओळखलं का? 

मुस्लिम कुटुंबात जन्म पण हिंदू नावामुळे मिळाली प्रसिद्धी, पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न करताच इंडस्ट्री सोडली

Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचं वैयक्तिक आयुष्य त्यांच्या अभिनयाइतकंच चर्चेत राहिलं आहे. त्यामध्येच सर्वात प्रथम एक नाव सर्वात लवकर पुढे येतं ते म्हणजे अभिनेत्री रीना रॉय यांचं. रीना रॉयने आपल्या अभिनयाने 70 आणि 80 च्या दशकात संपूर्ण भारतात लोकप्रियता मिळवणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र दुर्दैवी ठरली. त्यांना मुस्लिम असल्याने मोठ्या पडद्यावर हिंदू नावाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर रीना रॉयने एका पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केलं. त्यानंतर तिचे नशीब बदलले.  

पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न

पाकिस्तानच्या प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहसिन खान यांच्याशी रीना रॉयने लग्न केलं. त्यानंतर त्यांचं आयु्ष्य थोंड स्थितर होऊ लागलं. लग्नानंतर काही काळासाठी त्यांनी चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला. मात्र, काही दिवसांनंतर तिच लग्न टिकलं नाही. अनेक प्रयत्न करून देखील तिला नातं टिकवण्यात यश आलं नाही. शेवटी दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर रीना रॉय यांच्या जीवनात संघर्ष वाढत राहिला. लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रीना रॉय ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयामुळे एकाकी पडली. 

का टिकू शकलं नाही नातं? 

रीना रॉय आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खान यांचं लग्न अनेक दिवस चर्चेत राहिलं. या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होत. पण हे दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. कारण रिपोर्टनुसार, मोहसिन खान लंडनमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत होते. त्यांचा हा निर्णय रीना रॉयला मान्य नव्हता. त्यामुळे या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद होत राहिले. 1990 मध्ये अखेर त्यांनी घटस्फोट घेतला आणि दोघे वेगळे झाले. 

रीना रॉयचे खरे नाव काय? 

अभिनेत्री रीना रॉय यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव सादिल अली आणि आईचे नाव शारदा रॉय होते. तिचे खरे नाव सायरा अली होते. परंतु, तिच्या पालकांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीने तिचे नाव रूपा रॉय असे बदलले आणि पुन्हा एकदा दिग्दर्शक बी.आर. इशारा यांनी अभिनेत्रीचे नाव रूपा रॉय वरून रीना रॉय असे बदलले.

Read More