Marathi News> मनोरंजन
Advertisement

जेव्हा रेखाने कांजीवरम साडीच्या ब्लाऊजसोबत केला एक्प्रिमेंट, अभिनेत्रीची फॅशन बनली ट्रेंड

सध्या साड्यांसाठी देखील अनेक प्रकारच्या स्टाईल्स फॉलो केल्या जातात.

जेव्हा रेखाने कांजीवरम साडीच्या ब्लाऊजसोबत केला एक्प्रिमेंट, अभिनेत्रीची फॅशन बनली ट्रेंड

मुंबई : अभिनेत्री रेखा यांचं साडीवर असलेलं प्रेम जगापासून लपलेलं नाही. त्या नेहमी आपल्याला साडीतच पाहायला मिळतात. मग तो कोणताही कार्यक्रम असो, त्या साडीतच दिसतात. रेखा आणि साडी ही जोडी तशी सगळ्यांनाच पाहायला आवडते. रेखा बरोबरच यांच्या साडीचे देखील चाहते आहे. रेखा ज्या प्रकारे साडी कॅरी करतात, त्यासोबतचा त्यांचा मेकअप सगळ्यांनाच फार आवडतो. रेखा यांची साडी घालण्याची आपली स्वत:ची एक स्टाईल आहे आणि ती स्टॅईल त्या नेहमी फॉलो करत असतात.

आपल्याला हे तर माहीत आहे की, बॉलिवूड असो किंवा एखादी टीव्ही सिरीयल, त्यामधील अभिनेत्री ज्या प्रकारे कपडे किंवा स्टाईल करतात, जे ट्रेंडमध्ये येते. जसे की, लुंगी डांस गाण्यामधील दीपिका पदूकोणची साडी असो किंवा कुछ कुछ होता है मधील राणी मुखर्जीचे हेअर पिन असो, लोकं त्यांना ट्रेंडमध्ये आणतात.

सध्या साड्यांसाठी देखील अनेक प्रकारच्या स्टाईल्स फॉलो केल्या जातात. त्यात कांजीवरम साडीवर बॉलिवूड विश्वाचे विशेष प्रेम आहे. सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारे या साडीला कॅरी करतात. तसे पाहाता कांजीवरम साडीचा ब्लाऊज हा डिपनेक आणि स्लीवलेस असतो. त्या व्यतिरिक्त त्या साडीसाठी कोणी एक्प्रिमेंटल पद्धतीने घातलं नाही.

परंतु अभिनेत्री रेखा यांनी कांजीवरम साडीला आपल्या पद्धतीने घालायला सुरूवात केली, ज्यामुळे याचा सर्वत्र ट्रेंड बनला.

रेखा यांनी कधी साडीवर कुर्ता तर कधी साडीवर सलवार घालून नवीन ट्रेंड सेट केला होता. रेखाला कांजीवरम क्वीन म्हटले जाते आणि या साडीला वेगळी स्टाईल देण्यासाठी रेखाने ब्लाउजची स्टाईलही बदलली.

fallbacks

खरेतर रेखा यांनी कांजीवरम साडीसोबत क्लेजनेक ब्लाऊज आणि फुल स्लीव ब्लाऊज घालायला सुरूवात केली. ज्यानंतर बऱ्याच लोकांनी या स्टाईलला फॉलो करत आता त्याचा ट्रेंड बनवला आहे. त्यामुळे कांजीवरम साडीसोबत अशा प्रकारे ब्लाऊज घालण्याची स्टाईल सुरू करण्याचं क्रेडिट रेखा यांना दिलं जातं..

कांजीवरममध्ये हिट झाल्यानंतर रेखाने मुकेश अंबानींच्या घरी लग्न सोहळ्यात बनारसी साडीसोबत फुल स्लीवचा ब्लाउज घातला होता. त्यानंतर आता सर्वच सेलिब्रिटी अशा फुल स्लीव ब्लाऊज सोबत फॅशन करु लागले आहेत.

Read More