Sai Tamhankar : राज्यभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील गिरगावमध्ये शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेचं खास आकर्षण म्हणजे सेलिब्रिटी असतात. या यात्रेत ते दरवर्षी सहभागी होत असतात. अशातच यावर्षी या शोभायात्रेत मराठी चित्रपटातील काही कलाकार उपस्थित होते. ज्यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले आणि ईशा डेसह आगामी 'गुलकंद' चित्रपटाची टीम देखील या शोभायात्रेत सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी खास फोटोशूट देखील केलं. सध्या याच शोभायात्रेमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री सई ताम्हणकरच्या चाहत्याने शेअर केला आहे.
सई ताम्हणकरच्या व्हिडीओमध्ये काय?
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी तिच्या हटके स्टाईल आणि मनमोकळ्या वक्तव्याने चर्चेत असते. अशातच तिचा गिरगाव शोभायात्रेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्याने काढलेला हा व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. सध्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सई ताम्हणकरने हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन दिलं आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, हा फॅन मोमेंट माझ्या कायम आठवणीत कोरला जाईल. चाहत्यांने हा व्हिडीओ सईला टॅग करत हार्ट इमोजी देखील जोडली आहे.
व्हायरल व्हिडीओ सई ताम्हणकर ही तिच्या 'गुलकंद' चित्रपटाच्या टीमसोबत दिसत आहे. या चित्रपटाबाबत एक मुलाखत सुरु असल्याचं दिसत आहे. त्यावेळी सई ताम्हणकरचा चाहता खालून ए सई...अशी हाक मारतो. त्यावेळी सई त्याला हात जोडून अभिवादन करते. पण हा चाहता परत सईला ए सई सही दे ना म्हणून हाक मारतो. पण सई ताम्हणकर मुलाखतीत व्यस्त असल्याने त्याच्याकडे बघत नाही. सतत हाक मारत असल्यामुळे सई त्याला म्हणते की, अरे थांब इंटरव्ह्यू चालू आहे. सई चाहत्याच्या हातातील कागद आणि पेन घेते आणि त्याला सई देते. सई सही देताच चाहते कल्ला करतात. सध्या सईचा हा गोड व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.