Marathi News> मनोरंजन
Advertisement

'माझा ड्रेस...', अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट! स्कर्ट वर करुन व्रण दाखवत म्हणाली, 'तुम्हीसुद्धा...'

Actress Shares Scary Accident: अभिनेत्रीनेच यासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून दिलेली आहे. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरुन तिने ही माहिती दिली आहे.

'माझा ड्रेस...', अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट! स्कर्ट वर करुन व्रण दाखवत म्हणाली, 'तुम्हीसुद्धा...'

Actress Shares Scary Accident: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रोशनी वालिया ही 'भारत के वीर पूत्र- महाराणा प्रताप' मालिकेमध्ये अजबदे पुंवार या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. या अभिनेत्रीबरोबर नुकताच एक विचित्र प्रकार घडला. दुचाकीच्या टायर आणि चैनमध्ये ड्रेस अडकल्याने रोशनीचा अपघात झाला. या अपघातात तिच्या मांडीवर जखम झाली आहे. रोशनीनेच आपला एक फोटो पोस्ट करत या प्रकरणाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

नेमकं या अभिनेत्रीबरोबर घडलं काय?

रोशनीने आपल्या स्नॅपचॅटवर जखमी झाल्याचा फोटो शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. "हॅलो चाहत्यांनो, तुमच्यासाठी एक अपडेट. सध्या मला फार वेदना होत आहेत. अनेकजण मला विचारत आहेत की मला ही जखम कशी झाली. माझा ड्रेस बाईकच्या टायर आणि चैनमध्ये अडकला. त्यामुळे ड्रेसचा माझ्या मांडीभोवती पिळ पडला. अखेर तो ड्रेस फाटला. मात्र त्यामुळे ही जखम झाली. हा फारच धक्कादायक अनुभव होता," असं रोशनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काळजी घेण्याचं केलं आवाहन

"तुम्हीसुद्धा बाईकवर बसताना काळजी घ्या. बाईकवरुन जाणार असाल तर सैल कपडे परिधान करणं टाळा. मला सध्या फार त्रास होतोय पण फार काही गंभीर झालं नाही यासाठी मी समाधानी आहे. तुम्हाला सर्वांना फार सारं प्रेम, माझी एवढी काळजी करण्यासाठी धन्यवाद, सुरक्षित राहा!" असंही रोशनीने पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 

fallbacks

इन्स्टा स्टोरीवर शेअर केला जखमेचा फोटो

रोशनीने या पोस्टनंतर काही तासांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला झालेल्या जखमेचा फोटो आणि उदास इमोजी पोस्ट केला.

fallbacks

अजय देवगणबरोबर झळकणार

कामाबद्दल बोलायचं झालं तर रोशनी आता अजय देवगनच्या आगामी 'सन ऑफ सरदार 2'मध्ये झळकणार आहे. 2012 साली प्रदर्शित झालेल्या  'सन ऑफ सरदार'चा हा सिक्वेल आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि जुही चावला यांनी काम केलं होतं. 'सन ऑफ सरदार 2'मध्ये मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचं नुकतेच युनायटेड किंग्डममध्ये शुटींग झालं. या शुटींगदरम्यान रोशनीने अजय देवगण बरोबरचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. 

Read More