Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीला लग्न करायचंय, पण जेवण बनवता येत नाही, पाहा सासुबाई काय म्हणाल्या?

शिबानी आणि फरहान आता विवाहबंधनात अडकणार असल्याने खूपच चर्चेत आहेत. 

 अभिनेत्रीला लग्न करायचंय, पण जेवण बनवता येत नाही, पाहा सासुबाई काय म्हणाल्या?

मुंबई : अभिनेता फरहान अख्तरची आई हनी इराणी यांना होणाऱ्या सुनेचा फूडी असा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हाही त्यांची भावी सून घरी यायची तेव्हा काहीतरी चांगले बनवण्याची विनंती करते.

शिबानी आणि फरहान आता विवाहबंधनात अडकणार असल्याने खूपच चर्चेत आहेत. यावेळी आता फरहानच्या आईची एक मुलाखत समोर आली आहे. ज्यामध्ये त्यांनी शिबानीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. शिबानी आणि फरहान लिव इन अनेक वर्षांपासून रिलेशनशीप होते. आता अखेर ते लग्नबंधनात अडकत आहेत.

शिबानी हिला जेवण बनवता येत नाही. म्हणून ती नेहमी आपल्या सासूबाई हनी यांना भेटायला गेल्यावर कोणती तरी खास डिश बनवण्याची विनंती करत असल्याचं समोर आलं आहे.

 फरहानची आई हनी यांना शिबानी खूप आवडते. शिबानीला त्यांनी बनवलेला कोणता पदार्थ आवडतो. याबद्दल देखील त्यांनी सांगितले. हनी यांनी सांगितले की, जेव्हाही त्यांचा मुलगा शिबानीसोबत यायचा तेव्हा दोघेही काय बनायचं हे आधीच सांगायचे.

फरहान अख्तर हा जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी इराणी यांचा मुलगा आहे. हनी यांचे त्यांची भावी सून शिबानीसोबत खूप चांगले बॉन्डिंग आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी शिबानी आणि फरहानच्या फूड लव्हबद्दल सांगितले.

 हनी म्हणाल्या, "अनेकदा दोघेही मला फोन करून म्हणायचे, आई, आमच्यासाठी काहीतरी चांगलं बनवून ठेव. पुढे त्या म्हणाल्या की, "शिबानीला त्यांनी बनवलेलं गुआकामोल खूप आवडतं. सोबतच तिला नवाबी कीमा आणि इतर मटणाचे पदार्थही आवडतात. दोघेही फुडी आहेत."

Read More