Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shilpa Shetty च्या मुलीने कोणासमोर जोडले हात?

 स्वतः शिल्पानेही हृदयस्पर्शी गोष्टी लिहिल्या आहेत.

Shilpa Shetty च्या मुलीने कोणासमोर जोडले हात?

मुंबई : शिल्पा शेट्टी अनेकदा चर्चेत असते. कधी तिच्या शोमुळे, तर कधी तिच्या सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि फोटोंमुळे. नुकताच शिल्पा शेट्टीने आणखी एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये शिल्पा तिच्या लेकीसोबत मजामस्ती करताना दिसतेय. शिल्पा आपल्या मुलीसोबत गार्डनमध्ये वेळ घालवताना दिसत आहे. 

शिल्पा आणि शमिशा या माय-लेकींचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समीशा तिच्या आईसोबत गायत्री मंत्राचा पाठ करत आहे.इवल्याशा समिशाचे हे विधी पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

समिषा अजून 2 वर्षांचीही झालेली नाही. मात्र आतापासून तिला असे बोलताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि आनंदीही आहेत. ही पोस्ट शेअर करताना स्वतः शिल्पानेही हृदयस्पर्शी गोष्टी लिहिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिने लिहिले - "मुलांचे हृदय सर्वात शुद्ध असते, समिषा जी अजून 2 वर्षांची सुद्धा नाही, तिला करुणा आणि सहानुभूती यांची जाणीव होणं आश्चर्यकारक आहे. प्रार्थना आणि विश्वासाची शक्ती जगाला चालवत आहे. "

 

 

Read More