Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बारिक, सावळा रंग अशा मुली कशा अभिनेत्री होणार'; प्रियांका चोप्राच्या ऑनस्क्रीन आईनं पाहताच केलं जज

Smita Jaykar on Priyanka Chopra : अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काय आलं होतं ते सांगितलं आहे. 

'बारिक, सावळा रंग अशा मुली कशा अभिनेत्री होणार'; प्रियांका चोप्राच्या ऑनस्क्रीन आईनं पाहताच केलं जज

Smita Jaykar on Priyanka Chopra : अभिनय क्षेत्रात सौंदर्य हे सगळं काही आहे. सुंदरता नसेल तर काम मिळत नाही अशी तक्रार अनेक सेलिब्रिटी करताना दिसतात. त्यात रंगावरून देखील अनेकांना काम मिळालं नाही याविषयी देखील अनेक कलाकार बोलताना दिसले. पण आजच्या काळात डस्की अर्थात सावळ्या रंगाच्या अभिनेत्रींची लोकप्रियता खूप वाढली आहे. या लीस्टमध्ये काजोल, रेखा, बिपाशा बासू, राधिका आपटे आणि प्रियांका चोप्रासारख्या अनेक अभिनेत्री आहेत. त्यात जर प्रियांका चोप्राविषयी बोलायचं झालं तर तिनं आता हॉलिवूडमध्येही तिची लोकप्रियता मिळवली आहे. करिअरच्या सुरुवातीला प्रियांका खूप बारीक होती आणि तिचा रंग देखील सावळा होता. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या सगळ्यात अभिनेत्री स्मिता जयकर यांनी प्रियांकाला पाहिल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती याविषयी सांगितलं आहे. 

स्मिता यांनी 'फिल्मी मंत्रा'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका चोप्राविषयी सांगितलं आहे. खरंतर, अभिनेत्री स्मिता जयकर यांनी मोठ्या पडद्यावर प्रियांका चोप्राच्या आईची भूमिका साकारली आहे. त्याविषयी सांगायचं झालं तर स्मिता यांनी ‘किस्मत’ या चित्रपटात प्रियांकाच्या आईची भूमिका साकारली होती. याविषयी स्मिता यांनी सांगितलं की त्यांना प्रियांकाकडे पाहून वाटलं होतं की ही कशी अभिनेत्री होईल असा प्रश्न उपस्थित केला होता. 'मी प्रियांकासोबत तिच्या करिअरच्या सुरुवातीला असलेल्या किस्मत या चित्रपटात काम केलं. ती खूप बारिक आणि सावळी होती. तिला माझी आणि मोहन जोशीला भेटवलं आणि सांगितलं की ती आमच्या लेकीच्या भूमिकेत दिसणार आहे. जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा मी सांगितलं की अरे देवा. त्यावेळी ती खूप बारिक होती आणि मी विचार केला ही कशी अभिनेत्री होणार?', असं स्मिता म्हणाल्या. 

पुढे स्मिता म्हणाल्या, 'प्रियांका चोप्रानं कमालीचं काम केलं. मी विचार केला की क्या मुलीनं काय करुन दाखवलं. ती तर दीवा झाली. त्यामुळे तुम्ही कोणाला जज करू शकत नाही. कारण कोणचं नशिब कधी बदलेलं हे सांगता येत नाही.' दरम्यान, प्रियांका चोप्रानं अनेकदा तिच्या सावळ्या रंगामुळे तिला किती स्ट्रगल करावं लागलं याविषयी मोकळेपणानं सांगितलं आहे. 

Read More