Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्मिता तांबेच्या घरी आली लाडाची लेक !

स्मिताचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रमसुध्दा दोन महिन्यांपूर्वीच पार पडला होता. 

 स्मिता तांबेच्या घरी आली लाडाची लेक !

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबेने चाहत्यांना काही दिवसांपूर्वी आपण आई होणार असल्याची एक गोड बातमी दिली होती.स्मिताचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रमसुध्दा दोन महिन्यांपूर्वीच पार पडला होता.  तिचा डोहाळे जेवणाचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता.

 मराठीसोबतच हिंदीतही स्मिता दिमाखात झळकते. अनेक महिन्यांपासून स्मिता मनोरंजनविश्वापासून दूर होती त्याचं कारण हेच होतं, ती आई होणार असल्याने तिने सक्तीची विश्रांती घेतली होती.

लाडाची मी लेक गं या मालिकेत स्मिता साकारत असलेल्या पात्राचं खूपच कौतुक होत होतं.. आता अखेर स्मिताच्या घरी चिमुकल्या पावलांचं आगमन झालेलं आहे. 
2019 मध्ये स्मिताने विरेंद्र द्विदेवीसह लग्न केलं आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smita Tambe (@smitatambe)

आता या दोघांसोबत खेळायला मजामस्ती करायला एक चिमुकली आली आहे. स्मिताला मुलगी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून काहीही पोस्ट शेअर केली नसली तरीही तिच्या मित्रमैत्रिणींच्या स्टोरीवरून ही गोड बातमी समजली आहे. 

Read More