Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' अभिनेत्रीला देशाच्या सेवेसाठी सोडावा लागला हिट शो; 11 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर करणार कमबॅक

Famous Actress : या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्यात दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

'या' अभिनेत्रीला देशाच्या सेवेसाठी सोडावा लागला हिट शो; 11 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर करणार कमबॅक

Smriti Irani : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' च्या कमबॅकला घेऊन चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. स्मृती इराणी यांनी आता एक असा खुलासा केला की ज्यात छोट्या पडद्यावरील चाहत्यांना आश्चर्य झालं आहे. त्यांनी नुकतीच करण जोहर आणि बरखा दत्तसोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी खुलासा केला की दहा वर्षांपासून ते सीक्वलची प्लॅनिंग करत होते. पण त्यांच्या पॉलिटिकल करिअरमुळे हे होऊ शकलं नाही. 

लंडनमध्ये शूट झालेल्या करण जोहर आणि बरखा दत्तसोबत 'वी द वूमन'च्या एपिसोडमध्ये स्मृती इराणी यांनी हा खुलासा केला आहे. स्मृती इराणी यांनी सांगितलं की "जर तुम्ही 'क्योंकि सास भी कभी बहू थी' चा प्रवास पाहिला तर त्याविषयी असलेलं सीक्रेट जे आजवर सगळ्यांपासून लपवून ठेवलं, ते म्हणजे 2014 मध्ये या मालिकेचा सीक्वल येणार होता. हा माझा कॉन्ट्रॅक्ट होता आणि मी त्याला नकार दिला कारण मला कॅबिनेट मंत्री म्हणून भारतीय संसदेत सेवा करायची होती."

स्मृती इराणी यांनी सांगितलं की "जेव्हा कॉल आला तेव्हा प्रोडक्शन आधीच सुरु झालं होतं." याविषयी सांगत त्या पुढे म्हणाल्या, "सेट तयार झाला होता. पण पंतप्रधान कार्यालयातून एक फोन आला की तुम्हाला शपथ घ्यावी लागेल." स्मृती इराणी यांनी हा खुलासा केला की त्यांना या काळात ऋषी कपूर यांच्यासोबत एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण त्यांना या चित्रपटाला देखील नकार द्यावा लागला. तर पुढे या निर्णयावर विचार करत स्मृती इराणी यांनी सांगितलं की "मला आठवण आहे की ऋषी कपूर यांनी मला सांगितलं होतं की आता मी शो सोडायला हवा. कारण आपल्या देशाची सेवा करणं फक्त चित्रपट टेलीव्हिजन करण्यापेक्षा सगळ्यात मोठी सेवा आहे."

2000 मध्ये प्रदर्शित झालेली ही मालिका त्या काळातील सगळ्यात लोकप्रिय टेलीव्हिजन शो पैकी एक ठरली होती. एकता कपूरच्या बॅनर अंतर्गत प्रदर्शित झालेल्या या डेली सोपमध्ये वीरानी कुटुंबातील ड्रामेटिक चढ-उतार दाखवण्यात आले होते. ज्यात तुलसी ही सेंटर पॉइंट होती. 

2025 मध्ये पुन्हा एकदा शोचं जोरात काम सुरु झालं आहे. यात स्मृती इराणी या तुलसीच्या भूमिकेतच दिसणार आहेत. तर अमर उपाध्याय मिहीरच्या भूमिकेत. तर शोला सुरु करण्याआधी 3 जुलैला प्रीमियर करणार होते. पण प्रोडक्शन थोड्या काळासाठी झालं. एका सोर्सनं खुलासा केला की 'एकता कपूरला सेटमध्ये काही बदल हवे आहेत. ती पुन्हा एकदा सेट कसा हवा यासाठी काम करते आणि त्यामुळेच या मालिकेच्या प्रोडक्शनमध्ये उशीर होतोय.'

हेही वाचा : '...तर त्यांनी कैलासाला जावं'; पाक अभिनेत्रीवरून ट्रोल होणाऱ्या दिलजीत दोसांझला नसीरुद्दीन शाहांचा पाठिंबा

या गोष्टीला कन्फर्म करत अमर उपाध्यायनं सांगितलं की "हो, हे सत्य आहे. सेटवर पुन्हा एकदा काम करावं लागतंय. स्क्रीनवर रंगांचं कॉम्बिनेशन जसं हवं तसं होत नाहीये. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. एकताला चांगल्या प्रकारे माहित आहे की त्यांना काय पाहिजे. ते एक परफेक्शनिस्ट आहेत आणि हा आणखी एक शो नाही तर हा एक वारसा आहे आणि तिला शोसाठी सर्वोत्तम काम करायचं आहे."

Read More