Marathi News> मनोरंजन
Advertisement

चिमुकलीने गायलं संभाजी मालिकेचं टायटल साँग

 चिमुकलीने गायलं संभाजी मालिकेचं टायटल साँग

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका संभाजी ही प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. संभाजी ही मालिका आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडत आहे. चला हवा येऊ द्याच्या मंचावर मराठीतील अनेक अभिनेत्री आपल्या मुलांसोबत उपस्थित होते. यावेळी नकारात्मक भूमिकांसाठी लोकप्रिय असलेली स्नेहलता तावडे देखील आपल्या चिमुकलीसोबत उपस्थित होती. स्नेहलता तावडेने संभाजी या मालिकेत सोयराबाईची भूमिका साकारली आहे. ही भूमिका प्रेक्षकांनी पसंत केली आहे. चला हवा येऊ द्याच्या मंचावर स्नेहलता तावडेच्या मुलीने आपल्या गोंडस आणि बोबड्या बोलीत संभाजी या मालिकेच टायटल साँग गायलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Read More