Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रींवर लैंगिक अत्याचार करु पाहणाऱ्या बॉलिवूडमधील नराधमांची नावं समोर आणणार 'ही' अभिनेत्री

आता एक अभिनेत्री आता बॉलिवूडमधून असे चेहरे समोर आणण्यासाठी सज्ज झाली आहे.   

अभिनेत्रींवर लैंगिक अत्याचार करु पाहणाऱ्या बॉलिवूडमधील नराधमांची नावं समोर आणणार 'ही' अभिनेत्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्रींनी काही असे प्रसंग झेलले, ज्याचे त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठे परिणाम झाले. लैंगिक अत्याचार हे त्यापैकीच एक. 

हॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी हार्वी विन्स्टीन याच्या अभद्र विचारांचा आणि कृत्यांचा गौफ्यस्फोट करत त्याच्या करामतींना वाचा फोडण्यात आली होती, त्याचप्रमाणे आता एक अभिनेत्री आता बॉलिवूडमधून असे चेहरे समोर आणण्यासाठी सज्ज झाली आहे. 

अभिनेत्री सोमी अली हिनं कोणाचंही नाव न घेता एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिनं आपण, बॉलिवूडमधील हार्वी विनस्टीनच्या नावाचा उलगडा करणार असल्याचं सांगितलं. 

ज्या महिलांचा तुम्ही छळ केला आहे, त्या एकदिवस नक्कीच समोर येतील आणि सत्य समोर आणतील, जसं ऐश्वर्या राय हिनं केलं होतं. 

fallbacks

सोमीचाही शारीरिक छळ 
2018 मध्ये #MeToo दरम्यान स्वत:सोबत घडलेला प्रसंग समोर आणला. आपलाही शारीरिक छळ झाल्याचं तिनं त्यावेळी सांगितलं होतं. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते तर, 14 व्या वर्षी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली होती. 

Read More