Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'दबंग', 'लुटेरा', 'हीरामंडी', 'सन ऑफ सरदार' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने कामं केलं आहे. 2010 मध्ये 'दबंग' चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाची सुरुवात केली. तिला फिल्मफेअर बेस्ट फिमेल डेब्यू पुरस्कार मिळाला आहे. लवकरच सोनाक्षी सिन्हा 'निकिता रॉय' या हॉरर चित्रपटात दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अभिनेत्रीने एक धक्कादायक किस्सा शेअर केला आहे.
दरम्यान, सोनाक्षी सिन्हाने नुकताच तिला घाबरविणाऱ्या एका घटनेचा खुलासा केला आहे. ही घटना सोनाक्षी सिन्हाच्या घरात घडली आहे. जिथे तिला रहस्यमय अनुभवामुळे धक्का बसला. एका भयानक रात्री तिला हा सामना करावा लागला. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, तिने अनेकदा भीतीदायक सीन चित्रपटात केले आहेत. तिने तिचा भूतांवर विश्वास नसल्याची देखील सांगितलं. मात्र, एका रात्री तिच्यासोबत जे घडलं त्यामुळे तिचा विश्वास बसला आहे.
'शरीरावर कोणीतरी बसल्यासारखे वाटले'
सोनाक्षी म्हणाली की, ती सकाळी चारच्या सुमारास खूप गाढ झोपेत होती. अशातच तिला अचानक जाग आली. सकाळी गाढ झोपेत असताना तिला कोणीतरी उठवत असल्याचा तिला भास झाला. तसेच तिच्या शरीरावर कोणीतरी दबाव टाकत असल्याचं देखील तिला जाणवलं. तिला तिच्या शरीरावर कोणीतरी बसल्यासारखे वाटले. त्यावेळी ती खूप घाबरली. तिने तिचे डोळे देखील उघडले नाही. तसेच ती थोडी देखील हलली नाही.
सकाळ होईपर्यंत ती आहे त्याच स्थितीमध्ये झोपून राहिली. उजेड पडला तरी तिने डोळे उघडले नाही. तेव्हा तिला वाटले की कदाचित निरुपद्रवी भूत आहे. त्यावेळी तिने अज्ञात शक्तीशी बोलण्याचा निर्णय घेतला. ती तिच्या घरी गेल्यानंतर मोठ्याने ओरडली की काल रात्री जे काही झालं तर कृपया परत माझ्यासोबत होऊ नये. त्यानंतर तिला पुन्हा असा अनुभव कधीच आला नाही.
'निकिता रॉय'मध्ये दिसणार सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा लवकरच 'निकिता रॉय' या चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट 27 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक हॉरर चित्रपट असून सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. झहीर इक्बालशी लग्न केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिने वांद्रे येथील हाऊस 22.5 कोटी रुपयांना विकले आहे.