Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

सोशल मीडियावर सोनाली आपले सगळेच अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

मुंबई: आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर सोनाली आपले सगळेच अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते तेव्हा असाच एक इमोशनल व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना एक दुःखाची बातमी कळवली आहे. 

नुकतंच सोनालीच्या आजीचे निधन झाले आहे. आपल्या आजीवर सोनालीनं एक भावनिक पोस्टही इन्टाग्रामवर शेअर केली आहे. सोनालीनं आपल्या आज्जीसोबतचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केल्याने तिचे चाहतेही भावूक झाले आहेत.

हा व्हिडीओ सोनालीच्या लग्नातला आहे. त्या व्हिडीओत सोनाली आपल्या आज्जीसोबत खुपच सुंदर दिसते आहे. या व्हिडीओत सोनाली आपल्या आज्जीसोबत डान्सही करताना दिसते आहे. 

सोनालीनं केशरी-लाल रंगाची साडीही नेसलेली दिसते आहे. व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या आज्जीला तिने श्रद्धाजंली वाहिली असून सोबतच आपल्या आज्जीच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. 

सोनालीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिला पांठिबा दिला आहे. 

या पोस्टमध्ये सोनालीनं लिहिलं आहे की, “आजी तू आमच्यात असशील…आम्ही असेपर्यंत''. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनाली सध्या आपल्या लग्नामुळे भलतीच चर्चेत आहे. तिचं हे संपुर्ण लग्न प्लॅनेट मराठी ओटीटीवर दाखवण्यात आले आहे. नुकताच तिचा 'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

Read More