Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीचा पती वजन कमी करण्यासाठी टाकत होता दबाव; लग्नाच्या 2 महिन्यांनंतर अभिनेत्रीचा खुलासा

'देवो के देव महादेव' फेम अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहे. या दिवसांत आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे.

अभिनेत्रीचा पती वजन कमी करण्यासाठी टाकत होता दबाव; लग्नाच्या 2 महिन्यांनंतर अभिनेत्रीचा खुलासा

Sonarika Bhadoria Husband : टीव्ही सिरियल 'देवो के देव महादेव'मधील पार्वती म्हणजेच सोनारिका भदोरिया या दिवसांत आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने नुकतंच तिच्या लॉन्ग टर्म बॉयफ्रेंड विकास परासरसोबत लग्न केलं आहे. दोघांचंही लग्न कोणत्या फेरीटेलपेक्षा कमी नव्हतं. लग्नानंतर ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच एक्टिव्ह आहे. मात्र नुकताच सोनारिकाने एक मोठा खुलासा केला आहे. 

सोनारिकाने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने आपल्या मॅरेज लाईफबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सोबतच लग्नाआधी आपल्या आणि विकासच्या नात्याविषयीदेखील बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. या मुलाखती दरम्यान विकासने सांगितलं की, त्याला आत्ता लग्न झाल्यासारखं थोडेसं वाटत आहे. 

याचबरोबर सोनारिकाने रिवील केलं की, ती विकासला ९ वर्षांपासून डेट करत आहे. त्यामुळेच तिला लग्न झाल्याचं फिल होत नाहीये. अभिनेत्रीने असंही सांगितलं की, आम्ही लग्न झाले आहे असे वाटू नये म्हणून आम्ही अनेकदा याविषयी बोलत असतो. आत्तापर्यंत अशी भावना येत नाही. मला असं वाटतं की, याचा आमच्यावर  अजून परिणाम झाला नाही.  विश्वास बसत नाही की, आम्ही इतके वर्ष एकत्र आहोत. सोनारिकाने एक किस्सा देखील सांगितला की, आम्ही आमच्या मावशीच्या घरी डिनरला गेलो होतो. तिथे मावशीने सांगितलं की, तुमच्याकडे बघून तुम्ही विवाहित जोडपे आहात असे वाटत नाही.

सागरिकाला वजन कमी करण्यासाठी विकास टाकायचा दबाव
सोनारिकाने पुढे खुलासा करत सांगितलं की, जेव्हा माझं वजन वाढलं होतं त्यावेळी विकास कसा तिची काळजी घेत होता आणि तिला वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहित करत होते. अभिनेत्रीने असंही सांगितलं की, मला नाही माहिती ती पती असं करतात की नाही. मात्र जेव्हापासून आम्ही डेटींग करत आहोत नेहमीच मला सांगत होते. मला वाटत की,  तुम्ही स्वतःवर थोडा दबाव आणत आहात. कॅमेऱ्यात चेहरा चांगला दिसणार नाही. त्यामुळे तु थोडे वजन कमी केलं पाहिजे. विकास असा आहे जो मला फिट राहण्यासाठी मदत करतात.

आम्ही तुम्हाला सांगतो की, सोनारिका भदोरियाने लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड विकास परासरसोबत 8 फेब्रुवारी  २०२४ ला उद्यपूरमध्ये लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने आपल्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. ज्याला खूप पसंती मिळाली होती. 

Read More