बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने गर्भवती असताना आपल्याला सासऱ्यांमुळे फार मानसिक तणाव मिळाल्याचा खुलासा केला आहे. आपल्यासाठी तो पितृसत्ताक व्यवस्थेसंदर्भात आपल्याला मिळालेला तो फार मोठा झटका होता असंही तिने सांगितलं आहे. नुकतंच Filmymantra Media ला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने सांगितलं की, गर्भवती असताना मी लंडनमध्ये होते. यादरम्यान आपल्याला मुलगी होणार असल्याचं समजलं होतं. पण दुसरीकडे सासेर मात्र वारंवार नातवासाठी दबाव टाकत होते.
"मी गर्भवती असताना मला सर्वात आधी पितृसत्ताक व्यवस्थेचा झटका बसला. माझे सासरे मला रोज फोन करायचे आणि सांगायचे, मी माझ्या नातवाची वाट पाहत आहे असं सांगायचे," अशी आठवण तिने सांगितली. सुचित्रा त्यावेळी लंडनमध्ये वास्तव्यास होती. लंडनमध्ये गर्भलिंग चाचणी कायदेशीर आहे. यादरम्यान तिला आपल्या पोटी मुलगी ज्न्माला येणार असल्याचं समजलं होतं. "आम्ही फार आनंदी होतो. माझे आई वडील आणि सर्वजण आनंदाने उड्या मारत होतो. पूजा करत होता, मिठाई वाटत होतो," सांगत आठवणींना तिने उजाळा दिला.
पण दुसरीककडे सासरे सतत नातवासाठी दबाव टाकत असल्याने तिच्या आनंदावर फार लवकर विरजण पडलं. "माझे तेव्हाचे सासरे मला सतत फोन करायचे. मुलगी नाही झाली तर बरं, मला नातू हवा आहे असं सांगायचे. मी त्यांच्याशी बोलणंच बंद केलं," असा खुलासा करत तिने आपल्यावर याचा किती मानसिक परिणाम झाला याबद्दल सांगितलं.
सुचित्रा कृष्णमूर्तीने आपल्याला वैयक्तिक आयुष्यात आणि खासकरुन शेखर कपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर किती अचडणींचा सामना करावा लागला याबद्दलही सांगितलं. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, आपल्या घटस्फोटाचा मुलगी कावेरी कपूरवर फार परिणाम झाला होता. तिने कबूल केलं की, तिच्या स्वतःच्या भावनिक अस्थिरतेमुळे तिच्या मुलीसाठी परिस्थिती अधिक कठीण झाली असावी. कावेरीला त्या आव्हानात्मक काळाचं साक्षीदार व्हावं लागलं याबद्दल तिने खंत व्यक्त केली.
यादरम्यान तिने कोर्टातील सुनावणीदरम्यान सतत माध्यमांचं लक्ष मिळत असल्याने येणाऱ्या तणावाबद्दलही सांगितलं. आधीच मानसिक तणावात असताना अनपेक्षितपणे काढले जाणारे फोटे, लोकांचं लक्ष यामुळे त्यात भर पडत होती असं ती म्हणाली. आता मात्र मागे वळून पाहताना आपल्या भावनांचा सामना करणं व्यक्तिमत्वाचा एक भाग होतं असं म्हटलं आहे. सुचित्रा आणि शेखर कपूर यांचं 1997 मध्ये लग्न झालं. 2001 मध्ये त्यांच्या घऱी कावेरीचं आगमन झालं. आठ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.
सुचित्रा कृष्णमूर्तीने मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कभी हा कभी ना (१९९४), जजबात और वादे इरादे (1994), माय वाइफ्स मर्डर (2005) आणि आग (2007) यासारख्या उल्लेखनीय भूमिकांचा समावेश आहे. याशिवाय मित्तल वर्सेस मित्तल (2010), रोमियो अकबर वॉल्टर (2019) आणि ओल्ड कपल (2022) सारख्या इतर चित्रपटांचा समावेश आहे.