Surbhi Jyoti Lives in Separate Room From Husband : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सुरभी ज्योती आणि सुमित सूरी हे विवाह बंधनात अडकले. सुरभी सोशल मीडियावर त्या दोघांचे अनेक फोटो शेअर करताना दिसते. त्यांच्याती किती चांगली बॉन्डिंग आहे याविषयी सुरभीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. सुरभीनं सांगितलं की ती आणि सुमित एकमेकांसोबत किती कम्पॅटिबल आहेत. या विषयी बोलताना सुरभीनं सांगितलं की दोघं नवरा-बायको हे एकाच घरात राहत असले तरी वेगवेगल्या रुममध्ये राहतात आणि त्यामागे काय कारण आहे हे देखील तिनं सांगितलं.
सुरभीनं पिंकव्हिलाला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिनं सांगितलं की 'स्वत:ची स्पेस पाहिजे'. सुरभीनं तिच्या कुटुंबाविषयी सांगताना म्हटलं की ते दोघं घरूनच काम करतात. त्यामुळे त्या दोघांनी मिळून ठरवल्या प्रमाणे त्यांनी त्यांचे वेगवेगळे रूम ठेवण्याचा निर्णय घेतला. तर त्यासोबत तिनं हे देखील मान्य केलं की हे असं काही होणं हे नॉर्मल नाही.
तिनं पुढे सांगितलं की 'तो देखील घरून काम करतो, शूटिंग नसल्यावर मी देखील घरून काम करते. आम्हाला बाहेरच जायचं असतं असं नाही. आम्ही फक्त घरात राहून आनंदी राहतो. आम्हाला आमच्या चॉइसनुसार वेगवेगळे रूम ठेवले आहेत. कारण त्यानं त्याच्या आयुष्यातील जास्त काळ हा एकट्यानं काढला आहे आणि माझ्यासोबत देखील असचं झालं आहे. हा आम्ही दोघांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. हे कुछे झालं नाही पण असचं आहे.'
हेही वाचा : विराटचे चुकून Like अन् आता थेट टॉम क्रुजचा मदतीचा हात! भारतीय अभिनेत्रीला ड्रेस संभाळता येत नसल्याने टॉमने...
सुरभीनं हे देखील सांगितलं की माझं हे म्हणणं नाही की दुसऱ्या लोकांना हा ऑप्शन जमेल. सुरभी आणि सुमीत यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 2024 मध्ये उत्तराखंडमध्ये जमि कॉर्बेट रिजॉर्ट्सवर लग्न केलं. त्याच्या आधी काही वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. सुरभीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 'कुबूल है', 'इश्कबाज' आणि 'नागिन 3' सारख्या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. तर सुमीत हा 'द टेस्ट केस' आणि 'फियर फैक्टर: खतरों के खिलाडी 4' मध्ये देखील दिसला.