Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाळाच्या जन्माबाबत Nusrat Jahan, यशचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का

नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांच्या नात्याची ही बाजू सर्वांनाच अनपेक्षित

बाळाच्या जन्माबाबत Nusrat Jahan, यशचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का

मुंबई : अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ त्यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा खासगी आयुष्यामुळंच जास्त चर्चेत राहिल्या. फार कमी वेळात विविध कारणांनी त्या चर्चेत आल्या. काही दिवसांपूर्वीच नुसरत जहाँ यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळानंतर नुसरत यांच्या मुलाचा जन्म अनेक चर्चांना वाव देऊन गेला. ज्यानंतर आता नुसरत जहाँ आणि त्यांच्यासोबत नाव जोडलं जाणाऱ्या यश दासगुप्ता यांनी बाळाच्या जन्मबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्याचं म्हटलं जात आहे.

मुलाच्या जीवनात राहायचं की नाही याची निवड करण्याची मोकळीक नुसरतने मला दिल्याचं यश म्हणाला. एका मुलाखतीत यशने सांगितलं, ‘मला बाळ हवं होतं, पण मी त्याच्यासंदर्भातील अंतिम निर्णय नुसरतवरच सोडला होता. जेव्हा पहिल्याच वेळी जेव्हा नुसरतनं गरोदरपणाविषयी सांगितलं होतं तेव्हा तिला हवं असल्यास ती पुढे जाऊ शकते असं मी तिला सांगितलं होतं. हे तुझं शरीर आहे माझं नाही, त्यामुळं निर्णयही तुझाच असेल. मी तिला सांगितलं होतं की मी तुझी साथ केव्हाच सोडणार नाही. मला मुल हवं होतं पण, हा निर्णय मी तिच्यावर लादला नव्हता. मी हवं असल्यास पुढे जात आयुष्य जगण्याचा पर्याय तिन जेत मुलाचं संगोपन ती करु शकेल असंही सांगितलं होतं.’

आम्ही समाज काय विचार करेल यापासून दूरच राहिलो

मुलाबाबत ऐकून यश अजिबातच घाबरला नाही म्हणत हा आपल्या दोघांचा निर्णय असल्याचं नुसरतनं स्पष्ट केलं. आम्ही जग, समाज काय विचार करेल याची तमा बाळगली नाही, असं म्हणत एकत मला धीट महिला म्हणतील किंवा टोमणे मारतील अशी समाजाची मानसिकताही सर्वांपुढे ठेवली.

गरोदर महिलेला एकटं सोडलं असतं तर समाज माझ्याबद्दल काय बोलला असता, हे सपशेल अयोग्यच असतं असं यश म्हणाला आणि नुसरतसोबतचं नातं सर्वांपुढे ठेवलं. 26 ऑगस्टला नुसरत जहाँ यांनी एका मुलाला जन्म दिला. ज्यानंतर बऱ्याच चर्चा झाल्या. ज्याबाबत आता खुद्द या जोडीनंच काही गोष्टी सुस्पष्ट केल्या आहेत.

Read More