Marathi News> मनोरंजन
Advertisement

उकाड्याने हैराण उर्फी जावेदने शोधला असा उपाय की, गरमीचा विषयच नाही

उर्फी जावेदने गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी असा ड्रेस घातलाय की त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

उकाड्याने हैराण उर्फी जावेदने शोधला असा उपाय की, गरमीचा विषयच नाही

मुंबईः उर्फी जावेदने तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या दरम्यान उर्फी उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी एका शानदार ड्रेसमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे आणि दररोज बोल्ड फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्डनेससाठी खूप प्रसिद्ध आहे, तर अभिनेत्रीने पुन्हा एकदा बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी उर्फीने नवा मार्ग शोधला आहे.

उर्फी जावेदने तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी पार्कमध्ये फिरताना दिसत आहे. उन्हाळ्यात तिला सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्रीने बॅकलेस ब्लाउज घातला आहे. कॅप्शनमध्ये उर्फीने तिच्या लूकबद्दल लिहिले, 'उन्हाळ्याच्या हंगामात फुलांची साडी'.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

दोरीवाले ब्रॅलेटमध्ये उर्फीने तिचे सौंदर्य ज्या पद्धतीने दाखवले आहे त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अभिनेत्री मस्त स्टाईलमध्ये फिरताना दिसत आहे, तर ती उलटताना आणि अतिशय बोल्ड लूकमध्ये पोझ देतानाही दिसत आहे. उर्फीचा हा व्हिडिओ पुन्हा-पुन्हा पाहिला जात आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा जोरदार पाऊस पडतोय.

उर्फी जावेद आपल्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर एक वेगळीच खळबळ माजली आहे. चाहते उर्फीच्या प्रत्येक फोटोची आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात आणि उर्फीने तिचा लेटेस्ट लुक चाहत्यांसोबत शेअर करताच, काही मिनिटांतच तो व्हायरल होतो.

Read More