Actress Who Worked till the Age of 102 : चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाही. 100 पेक्षा जास्त काळापासून चित्रपट बनवत आहेत. अनेक कलाकार असेल आहेत ज्यांनी वयाच्या 100 री ओलांडल्यानंतर देखील चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. या कलाकारांमध्ये सगळ्यात वयस्कर आणि अनुभवी कलाकार कोणी असेल तर त्या जोहरा सहगल आहेत. अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही त्यांना शाहरुख खान, रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या आजीची भूमिका साकारताना पाहिलं आहे. पण या त्याच जोहरा सहगल आहेत ज्यांनी कधी बलराज राहिनी आणि देव आनंद यांच्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
जोहरा सहगल यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी सहारनपुरमध्ये झाला होता. त्यांनी लहानवयातच स्ट्रगल काय असतं ते पाहिलं होतं. पण त्यांची कला अर्थात त्यांचा अभिनय हा सगळ्यांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी एक कोरियोग्राफर म्हणून देखील काम केलं होतं आणि पाहता पाहता त्यांना त्यांचा पहिला चित्रपट 'नीचा नगर' मिळाला. हा एक ऐतिहासिक चित्रपट होता ज्याची आजही लोकांना आठवण आहे. त्यानंतर जोहरा यांनी 'धरती के लाल' आणि 'अफसर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. खरंतर, त्या कॅनेडियन, ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम करायच्या. पण त्यांनी बॉलिवूडमध्ये ज्या चित्रपटांमध्ये काम केलं ते सगळ्यांच्या लक्षात राहिले आहेत.
जोहरा सहगन यांनी त्यांच्या करिअरमध्ये सगळ्यात जास्त काम हिंदी चित्रपटांमध्ये केलं नाही. मात्र, त्यांनी सगळ्यात जास्त काम हे हिंदी थिएटर्समध्ये केलं. जोहरा यांनी 1998 मध्ये शाहरुख खानच्या 'दिल से' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातून त्यांनी एक नव्या पिढीसोबत काम करण्यास सुरुवात केली. जोहरा यांनी शाहरुखच्या 'दिल से' आणि 'वीर जारा' या चित्रपटांमध्ये काम केलं तर सलमान खानसोबत 'हम दिल दे चुके सनम' आणि रणबीर कपूरच्या 'सांवरिया' या चित्रपटात देखील काम केलं.
जोहरा सहगल यांनी परदेशातील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी ब्रिटिश चित्रपट द लॉन्ग डुएल, कॅनडियन चित्रपट मसाला, भाजी ऑन द बीच, बेंड इट लाइक बेकहम आणि द मिस्ट्रीज ऑफ स्पाइसेज सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. बेंड इट लाइक बेकहम मध्ये त्या अनुपम खेर यांच्यासोबकत दिसल्या होत्या. तर 'मिस्ट्रीज ऑफ स्पाइसेज' या चित्रपटात त्या ऐश्वर्या रायसोबत दिसल्या होत्या.
हेही वाचा : 'पुढची सुट्टी कश्मीरमध्येच...'; पहलगाममध्ये दहशतवादी हल्लानंतर सुनील शेट्टीचं अनोखं आवाहन
जोहरा सहगल यांनी जवळपास 72 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केलं. त्या इंडस्ट्रीतल्या सगळ्यात वयस्कर आणि अनुभवी कलाकार म्हणून ओळखल्या जात होत्या. त्या वयाच्या 102 वर्षी देखील अभिनय क्षेत्रात काम करत होत्या. तर 2012 मध्ये कार्डियक अरेस्टमुळे दिल्लीत त्यांचे निधन झाले.