Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून कलाविश्वाला रामराम ठोकणारी झायरा वसिम नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

'दंगल गर्ल'वर टीका होण्याचं कारण आहे...... 

...म्हणून कलाविश्वाला रामराम ठोकणारी झायरा वसिम नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

मुंबई : काही महिन्यांपूर्वी 'दंगल गर्ल' म्हणून कलाविश्वात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री झायरा वसिम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होती. धर्माचं कारण देत तिने चित्रपट विश्वाला रामराम ठोकला होता. पण, आता मात्र ती 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकत आहे. इतकच नव्हे, तर या चित्रपटाच्या स्टारकास्टसोबतही झळकत आहे. याच कारणावरुन झायरावर निशाणा साधण्यात आला आहे. 

'दंगल गर्ल'वर टीका होण्याचं कारण आहे, प्रियांकाने शेअर केलेला एक फोटो. टीफ, म्हणजेच टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या आगामी चित्रपटातं स्क्रीनिंग असल्याचं एक फोटो शेअर करत स्पष्ट केलं. द स्काट इज पिंक या चित्रपटाविषयीची माहिती देत प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्त दिसत आहे. ज्यामध्ये खुद्द प्रियांका, फरहान अख्तर, रोहित सुरेश सराफ आणि झायरा वसिम हिचाही सहभाग आहे. 

इतर कलाकारांचं या फोटोमध्ये असणं स्वीकारार्ह असलं तरीही झायराची उपस्थिती मात्र अनेक प्रश्न चाळवून गेली आहे. इस्लाम धर्माचं कारण पुढे करत काही महिन्यांपूर्वी चित्रपट विश्व आणि संपूर्ण कलाविश्वालाच अलविदा करणारी झायरा आता द स्काय इज पिंकच्या टीमसोबत करतेय तरी काय, हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. 

fallbacks

fallbacks

fallbacks

तर, ही तिच मुलगी आहे ना जिने धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडलं होतं... किती तो बनेलपणा करावा.... प्रसिद्धीसाठी खोटं का बोलावं, अशा शब्दांमध्ये झायरावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. आपल्यावर होणारी ही टीका आणि या साऱ्यातच प्रदर्शित करण्यात आलेला तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहता झायरा यावर कशी व्यक्त होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More