Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री अदा शर्माचा हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल

यावेळेस ती कमोंडो गर्ल प्रमाणे कारनामे करताना दिसत आहे. तिचा एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या चर्चेचा विषय आहे.

अभिनेत्री अदा शर्माचा हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री अदा शर्मा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर जास्त अॅक्टीव्ह असते. आपल्या अकाऊंटवरून ती काहीना काही शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी ती साडीवर वर्कआऊट करताना दिसली. यावेळेस ती कमोंडो गर्ल प्रमाणे कारनामे करताना दिसत आहे. तिचा एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या चर्चेचा विषय आहे. रश्शीच्या सहाय्याने ती वेगवेगळ्या एक्सरसाइज करताना दिसतेय. सर्वसाधारण मनुष्याला असं करणं कदाचित जमू शकेल. अदा शर्माने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यावर कॅप्शनही लिहिली आहे. 'अशाप्रकारे झोपू शकेल त्याला हे टॅग करा.' असे कॅप्शन तिने लिहिले आहे. 'तुम्ही मला विचारत असताना की बिकनी बॉडी कशी मिळाली ? तर मग हे पाहा. सर्वांना अशा प्रकारे झोपावं लागेल. (पूर्ण रात्र) आणि ८ पॅक्स एब्स फ्री फ्री फ्री ! खरं सांगायचं तर यासाठी खूप सारी स्थिरता आणि ताकदीची गरज आहे. 'आंतरराष्ट्री मल्लखांब दिवस जगभरात साजरा केला जातोय. उदय देशपांडे सर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे.'

'कमांडो ३'

अदा शर्माला कमांडो गर्लदेखील म्हटलं जातं. ती आपला आगामी सिनेमा 'कमांडो ३' ची अशाप्रकारे तयारी करत आहे. फिटनेसच्या बाबतीत ती कोणत्या बड्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.तिचे हे व्हिडिओ पाहून आगामी सिनेमात अॅक्शन सीन दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Read More