Marathi News> मनोरंजन
Advertisement

Adar Poonawalla यांची पत्नी नताशाचा स्टनिंग लूक, रेड कार्पेटवर पाहून सगळेच थक्क

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालिका नताशा पूनावाला (Natasha Poonawala) यांनी आपल्या लूकने संपूर्ण कार्यक्रमच लुटला.

Adar Poonawalla यांची पत्नी नताशाचा स्टनिंग लूक, रेड कार्पेटवर पाहून सगळेच थक्क

Natasha Poonawalla Metal Corset : फॅशनचा सर्वात मोठा कार्यक्रम, Met Gala 2022 सुरू झाला आहे. हॉलिवूड सेलिब्रिटी रेड कार्पेटवर एकापेक्षा जास्त डिझायनर पोशाख परिधान करून त्यांच्या पोशाखांची चमक दाखवत आहेत. पण बॉलिवूडनेही त्याची चमक कमी होऊ दिली नाही. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालिका आणि अदार पूनावाला (Adar Poonawala) यांच्या पत्नी नताशा पूनावाला (Natasha Poonawala) यांनी आपल्या लूकने संपूर्ण कार्यक्रमच लुटला. नताशाने या स्टनिंग लूकमध्ये रेड कार्पेटवर प्रवेश करताच सर्वजण थक्क झाले.

fallbacks

नताशाने फॅशनच्या सर्वात मोठ्या इव्हेंटसाठी ऑल गोल्डन पोशाख घातला होता. नताशा पूनावाला या आउटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती. तिचा हा लूक मेट गालाच्या ड्रेस कोड गिल्ड ग्लॅमरला पूर्णपणे न्याय देत होता. नताशाच्या पोशाखाचे वैशिष्ट्य म्हणजे तिने तिची साडी आणि ट्रेल शियापेरेलीच्या मेटॅलिक बस्टियरसह जोडले. एवढेच नाही तर नताशाने जी सब्यसाची साडी नेसली ती हॅण्डक्राफ्ट प्रिंटेड ट्यूल आहे.

नताशा पूनावालाची स्टाइल अनिता श्रॉफ अदजानियाने केली होती. नताशाच्या ट्रेलबद्दल सांगायचे तर तिला एक खास टचअप देखील देण्यात आला आहे. हे रेशीम फ्लॉस धागा, बेव्हल मणी, अर्ध मौल्यवान स्टोन, क्रिस्टल, सिक्विन आणि मखमलीपासून बनवले जाते. जे तिने कस्टम ज्वेलरी सब्यसाचीच्या कलेक्शनसोबत जोडले. तिचा वरपासून खालपर्यंतचा संपूर्ण लुक 'इन अमेरिका: ऑन एन्टरोलॉजी ऑफ फॅशन' या थीमवर आधारित होता. 

fallbacks

नताशा पुनावालाचा हा जबरदस्त लूक सोशल मीडियावर येताच सगळ्यांनाच तिचे वेड लागले. नताशा पूनावालाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या आउटफिटचे सर्वजण कौतुक करत आहेत.

Read More