Marathi News> मनोरंजन
Advertisement

...या चित्रपटात डुक्कराचं पिल्लू निभावणार प्रमुख भूमिका

पिल्लाला रस्त्यावर फिरवून वेगळ्या प्रकारे या चित्रपटाचं प्रमोशन

...या चित्रपटात डुक्कराचं पिल्लू निभावणार प्रमुख भूमिका

मुंबई : नेहमीच वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या अभिनेता-दिग्दर्शक रवी बाबू यांच्या 'अधुगो' या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. या चित्रपटात डुकराचं पिल्लू प्रमुख भूमिकेत दिसणार असून हे पिल्लू खतरनाक एक्शन सीन्स करताना दिसणार आहे. 

'बंटी' नाव असलेल्या या पिल्लाच्या आसपास या चित्रपटाचं कथानक फिरताना दिसेल. नुकतंच, रवी बाबू यांनी या पिल्लाला रस्त्यावर फिरवून वेगळ्या प्रकारे या चित्रपटाचं प्रमोशन केलं. 

यावेळी रवी बाबुंची संपूर्ण टीम उपस्थित होती. 'अधुगो' थ्रीडीमध्ये ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होतोय. पाहा, या चित्रपटाचा ट्रेलर...

Read More