Marathi News> मनोरंजन
Advertisement

Viral Video: तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने केलं कृति सेननला Kiss, Video तुफान व्हायरल!

Kriti Sanon Om Raut Viral Video: आदिपुरुष चित्रपटाच्या (Adipurush Movie) प्री-रिलीज इव्हेंटनंतर आदिपुरुषची टीम बुधवारी तिरुपतीमध्ये पोहचली होती.  तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने असं काही केलं की... 

Viral Video: तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने केलं कृति सेननला Kiss, Video तुफान व्हायरल!

Kriti Senon Kiss Viral Video: साऊथ सुपरस्टार प्रभास आणि स्टार अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट (Adipurush) लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. हा चित्रपट 16 जूनला रिलीज होणार असल्याने आदिपुरुषची टीम जोरदार प्रमोशन करत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता एका व्हिडिओमुळे (Viral Video) वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 6 जून रोजी तिरुपतीमध्ये प्री-रिलीज इव्हेंट आयोजित केला होता. त्यासाठी संपूर्ण कलाकार एकत्र दिसले.

प्रभासचा हा चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांच्यामुळे वादात सापडले आहे. तिरुमला मंदिराच्या आवारात त्यांनी सर्वांसमोर अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हिचं गालावर चुंबन (Kiss) घेतल्यानं गोंधळ उडाला आहे. व्यंकटेश्वर मंदिरात आशीर्वाद घेतल्यानंतर क्रिती बाहेर आली. क्रिता जात असताना दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांना तिला मिठी मारताना आणि गालावर किस करताना दिसले. याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. भाजपचे आंध्रप्रदेश राज्य सचिव रमेश नायडू नागोथू यांनी ट्विट यावर आक्षेप नोंदवला आहे.

आदिपुरुष सिनेमाच्या प्रमोशनचा अंतिम टप्पा सुरू झालाय. प्रत्येक थिएटरमध्ये आदिपुरुषच्या स्क्रिनिंग दरम्यान, हनुमानासाठी एक जागा रिक्त ठेवली जाईल, असा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे सध्या चित्रपट चर्चेचा विषय ठरतोय. तर दिग्दर्शक अंधश्रद्धेला वाव देत असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय.  तेलगू , तमिळ , हिंदी, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषेमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पाहा Video

दरम्यान, या सिनेमामध्ये कृति सेनन माता सीतेच्या भूमिकेत तर सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिपुरुषच्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते 2 कोटींचा खर्च करणार आहेत. चित्रपटाचे हक्क आदिपुरुषने तेलुगु थिएटरला जवळपास 170 कोटींना विकले असल्याने आता चित्रपट येत्या काळात चांगली कमाई करेल, असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.

Read More