Marathi News> मनोरंजन
Advertisement

मॅकॅनिकला जीवे मारण्याची धमकी; आदित्य पांचोली अडचणीत

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, कार मॅकॅनिकला दिली जीवे मारण्याची धमकी

मॅकॅनिकला जीवे मारण्याची धमकी; आदित्य पांचोली अडचणीत

मुबंई : बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुंबईतील एका कार मॅकॅनिकने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

१० मार्च २०१७ रोजी आदित्य पांचोलीने कार मॅकॅनिक मौसिम राजापकर याच्याकडून कार दुरूस्ती तसेच काही मॉडिफिकेशन करून घेतले होते. या कार दुरूस्तीसाठी मॅकॅनिकने २ लाख ८२ हजार १५८ रूपये इतका खर्च सांगितला. परंतू आदित्य पांचोलीने कार चालवून पाहिल्यावर त्याचे पैसे देणार असल्याचे सांगितले. मौसिमने पैशांची विचारणा करण्यासाठी आदित्यला फोन व मेसेज करून त्याचा पाठपुरवठा केला. पण आदित्यने कोणतेही उत्तर न देता त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे मौसिमने सांगितले. 

मौसिमने याबाबत वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Read More