Marathi News> मनोरंजन
Advertisement

Malang Trailer : ऍक्शन, लव, थ्रिलर...मलंगचा दमदार ट्रेलर

'जान लेना मेरा नशा हैं...'

Malang Trailer : ऍक्शन, लव, थ्रिलर...मलंगचा दमदार ट्रेलर

मुंबई : आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, कुणाल खेमू आणि अनिल कपूर स्टारर 'मलंग' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'मलंग' चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. अखेर ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. 

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिशा, आदित्यशिवाय अनिल कपूर आणि कुणाल खेमूही जबरदस्त भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमधून या चारही लोकांचा उद्देश सारखाच असल्याचा दिसतंय. ते म्हणजे लोकांना मारणं...ट्रेलरमध्ये 'जान लेना मेरा नशा हैं' असं म्हणतं, आदित्य रॉय कपूर एका वेगळ्याच हटके अंदाजात पाहायला मिळतोय. ट्रेलरमध्ये आदित्य आणि दिशाची केमेस्ट्रीही पाहायला मिळतेय. 

मोहित सुरी दिग्दर्शित 'मलंग' व्हॅलेंटाईन विक म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

  

Read More