Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : ...अन् खास 'तिच्या'शी बोलण्यासाठी आदित्य ठाकरेंनी वडिलांना थांबवलं; भेटीनंतर छोटी मिठीही मारली

Aditya and Uddhav Thackeray From Ambani Wedding :  आदित्य ठाकरे यांनी वडील उद्धव ठाकरे यांना थांबवलं अन्... पाहा व्हायरल व्हिडीओ

VIDEO : ...अन् खास 'तिच्या'शी बोलण्यासाठी आदित्य ठाकरेंनी वडिलांना थांबवलं; भेटीनंतर छोटी मिठीही मारली

Aditya and Uddhav Thackeray From Ambani Wedding : काल उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं राधिका मर्चंटशी लग्न झालं. त्यांच्या लग्नाचा शाही विवाह सोहळा हा मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. यावेळी अनंत आणि राधिकाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी भारतातील आणि परदेशातील पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली होती. आता या पाहुण्यांमध्ये फक्त कलाकार नाही तर त्यांच्यासोबत अनेक बिझनेसमॅन आणि राजकारणी लोक होते. त्यामुळे अनेकांची अनपेक्षित पाहुण्यांशी देखील भेट झाली. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ हा उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे हे दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी क्रिम रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर सुप्रिया सुळे यांनी पैठणी साडी नेसली आहे. तर व्हिडीओच्या सुरुवातीला हे दोघं चालत असल्याचं दिसतं. तर मागून आदित्य ठाकरे येऊन त्यांचे वडील अर्थात उद्धव ठाकरे यांना थांबवतात आणि त्यांची ओळख ही मुंजा फेम अभिनेत्री शर्वरी वाघशी करून देतो. यावेळी शर्वरी आणि उद्धव ठाकरे हे काहीतरी बोलत असल्याचं दिसत आहे. तर त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे लक्ष जाताच शर्वरी त्यांना हात जोडून नमस्कार करते आणि त्यांच्याशी देखील बोलते. त्यानंतर निघायच्या वेळी शर्वरी ही आदित्य ठाकरे यांना मिठी मारते आणि तिथून निघून जाते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शर्वरीचं आहे राजकारणाशी खास कनेक्शन

शर्वरी ही फक्त अभिनेत्री नाही तर तिचं राजकारणाशी देखील खास कनेक्शन आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ती नात आहे. त्यामुळे आदित्य आणि शर्वरी हे दोघेही लहानपणापासूनचे चांगले मित्र असल्याचं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे जोशी कुटुंब आणि ठाकरे कुटुंबांचे आधीपासून चांगले संबंध होते. 

Read More