Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आईच्या अंत्यदर्शनलाही जाऊ दिलं नाही', पाकिस्तानची कटु आठवण सांगताना अदनान सामी झाला भावूक!

Adnani Sami : अदनान सामीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

'आईच्या अंत्यदर्शनलाही जाऊ दिलं नाही',  पाकिस्तानची कटु आठवण सांगताना अदनान सामी झाला भावूक!

Adnani Sami : अदनान सामी हा एक लोकप्रिस गायक आणि संगीतकार आहे. अदनान सामीनं 'तेरा चेहरा', 'माहिया', 'लिफ्ट करा दे' सारखी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. अदनान सामीचा जन्म लंडनमध्ये झाला. तर त्याचे वडील हे पाकिस्तानी होते. पण 2016 मध्ये अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मिळालं. त्याच्या वडिलांनी नेहमीच सांगितलं की कशा प्रकारे पाकिस्तानच्या राजकारणामुळे त्यांना त्यांचा मुलगा अदनान सामीला भेटता आलं नाही. अदनान सामीनं देखील यावर वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोल करण्यात येतं. एका नव्या मुलाखतीत अदनान सामीनं पाकिस्तानसोबत तणावपूर्ण संबंधांचं एक उदाहरण शेअर केलं आहे. त्यात त्यानं सांगितलं की त्याला त्याच्या आईच्या अंत्यविधीत देखील सहभागी होण्याची परवानगी नव्हती. 

अदनान सामीनं नुकतीच रजत शर्माच्या 'आप की अदालत' मध्ये मुलाखत दिली. या दरम्यान, त्याला विचारण्यात आलं की त्यानं 2016 मध्ये भारतीय नागरिक झाल्यानंतर कधी पाकिस्तानला जाण्याचा प्रयत्न केला होता. अदनाननं सांगितलं की ऑक्टोबर 2024 मध्ये त्याच्या आईचं निधन झालं. तर तो त्यांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा प्रयत्न करत होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ADNAN SAMI (@adnansamiworld)

आईच्या निधनानं अदनानला बसला धक्का

अदनाननं सांगितलं की त्याच्या आईच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कारण त्यांना आरोग्या संबंधीत कोणत्याही समस्या नव्हत्या. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांच्या त्याची परिस्थिती कशी समजून घेतली. याविषयी सांगत अदनान म्हणाला, 'मी इथल्या सरकारला विचारलं की माझी जाण्याची इच्छा आहे, तर तुम्हाला काही अडचन नाही नाही.' त्यांनी म्हटलं की' तुझ्या आईचं निधन झालंय, तर तू जायलाच हवं. त्यांच्याकडून काही अडचण नव्हती.'

भारतीय अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर जेव्हा अदनाननं पाकिस्तानी व्हीजासाठी अर्ज केला. तर त्यांनी तो स्वीकारला नाही. अदनाननं त्यांना सांगितलं की 'त्याला त्याच्या आईच्या अंत्यविधीला जायचं आहे. पण त्यांनी याला नकार दिला. अखेर अदनाननं त्याच्या आईचं अंत्यसंस्कार व्हाट्सअपवर एका व्हिडीओच्या माध्यमातून पाहिलं.' 

हेही वाचा : ₹46000000000 ची मालकीण... 2 वर्षात एकही चित्रपट नाही; तरीही आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

यावेळी अदनान सामीला या सगळ्यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला की त्याला पाकिस्तानच्या तुलनेत भारतात जास्त पैसे मिळतात म्हणून त्यानं भारताचं नागरिकत्व घेतलं का. उत्तर देत त्यानं सांगितलं की 'तो भाग्यशाली आहेत की त्याचा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला जिथे त्याला कधी पैशांची चिंता करण्याची गरज भासली नाही. त्यानं कधीच फक्त पैशांसाठी काही केलं नाही. त्याशिवाय त्यानं पाकिस्तानमध्ये त्याची कोटींती संपत्ती सोडून तो भारतात मी सुरुपासून सुरुवात केली आहे.'

Read More