Marathi News> मनोरंजन
Advertisement

तब्बल २० वर्षांनंतर संजय-सलमान दिसणार एकत्र

तब्बल २० वर्षांनंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एकत्र काम करणार आहेत. याआधी १९९९ साली प्रदर्शीत झालेल्या 'हम दिल दे चूके सनम' सिनेमाच्या माध्यमातून हे दोघे एकत्र आले होते.

तब्बल २० वर्षांनंतर संजय-सलमान दिसणार एकत्र

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमांच्या दिग्दर्शनाचे काम केले. त्यांचे अनेक सिनेमे प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकले. आज ते त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक महत्वाची घोषणा केली आहे. तब्बल २० वर्षांनंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एकत्र काम करणार आहेत. याआधी १९९९ साली प्रदर्शीत झालेल्या 'हम दिल दे चूके सनम' सिनेमाच्या माध्यमातून हे दोघे एकत्र आले होते. सिनेमात सलमान खान आणि एश्वर्या राय मुख्य भूमिकेत झळकले होते. या जोडीला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भन्साली प्रोडक्शनच्या सीइओ प्रेरणा सिंग यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. संजय-सलमान २० वर्षांनंतर एक प्रेम कथा चाहत्यांच्या भेटीस आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.  

दिग्दर्शक संजय लीला भन्सालींचा २४ फेब्रुवारी १९६३ साली झाला आणि १९९९ साली त्यांनी स्वत:च्या एसएलबी फिल्मसची निर्मिती केली. २०१५ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’ सिनेमांसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ निर्देशक फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानीतकरण्यात आले.

Read More