Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नाच्या 1 महिन्यानंतर झहीर इक्बालचा खुलासा! पळून जाणारच होतो, पण...

Zaheer Iqbal Wanted To Elope Get Married : झहीर इक्बालला सोनाक्षी सिन्हासोबत पळून जाऊन करायचं होतं लग्न... लग्नाच्या महिन्याभरानंतर केला खुलासा 

लग्नाच्या 1 महिन्यानंतर झहीर इक्बालचा खुलासा! पळून जाणारच होतो, पण...

Zaheer Iqbal Wanted To Elope Get Married : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या महिन्यात 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न बंधनात अडकली. त्यांनी कोणत्याही धर्माच्या परंपरेनुसार नाही तर थेट रजिस्टर लग्न केलं. त्यांच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र-मैत्रिण उपस्थित होते. तर त्यांनी सगळ्यासाठी एक खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन देखील केले होते. ते जवळपास 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर त्यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. 

लग्नानंतर हनीमूनसाठी ते दोघं सिंगापुर आणि फिलीपींसला गेले. झहीरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की त्यानं केलेली लग्नाची प्लॅनिंग ही पूर्णपणे वेगळी होती तर सोनाक्षीनं वेगळ्या पद्धतीनं लग्नाची प्लॅनिंग केली होती. झहीरला या देशातून पळून जाऊन लग्न करायचं होतं, पण त्याला नंतर हे कळलं की हे मान्य नाही. नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं Galatta India ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाच्या प्लॅनिंगविषयी खुलासा केला. सोनाक्षीनं सांगितलं की 'तिनं आधीपासून ठरवलं होतं की ती कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न करणार. पण तेव्हा झहीर मध्येच म्हणाला आणि मला पळून जायचं होतं... फक्त देशातून कुठे बाहेर, लग्न करायचं आणि परत यायचं होतं पण मला नंतर कळलं की भारतात अशा लग्नाला मान्यता नाही.' 

सोनाक्षीनं सांगितलं की तिला खूप छोटं लग्न करायचं होतं. तर झहीरनं केलेला प्लॅन कॅन्सल करण्यात आला. याविषयी सोनाक्षीनं सांगितलं की 'तिला नातेवाई आणि मित्रांनी लग्नात हजेरी लावण्याविषयी काही हरकत नव्हती. तिनं हे देखील सांगितलं की तिला लग्नात सगळ्या लोकांना सहभागी करायचे होते, जे तिच्या आयुष्याचा भाग आहेत.' 

हेही वाचा : 'बरं झालं करिश्मा कपूरशी लग्न झालं नाही! करीना किमान...' सैफ अली खानचं मोठं विधान

सोनाक्षी आणि झहीरनं सांगितलं की 'लग्नानंतर त्यांनी एक मोठी पार्टी देण्याचे ठरवले होते. त्याविषयी सांगत सोनाक्षी म्हणाली, झहीर आणि सोनाचं लग्न आहे तर एक पार्टी असायलाच हवी. तर आलेल्या पाहुण्यांनी खूप वेळ दिला त्यासोबत नवविवाहित दाम्पत्यानं खूप धम्माल केली.'

Read More