Marathi News> मनोरंजन
Advertisement

१२ वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार टीव्हीची ही पॉप्युलर जोडी

मालिका जगतातील जस्सी जैसी कोई नही या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱी अभिनेत्री मोना सिंहने जस्सीच्या भूमिकेतून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. जस्सीच्या भूमिकेने मोनाला ओळख दिली. या मालिकेत जस्सी आणि अपूर्वची जोडी हिट ठरली होती.

१२ वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार टीव्हीची ही पॉप्युलर जोडी

मुंबई : मालिका जगतातील जस्सी जैसी कोई नही या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱी अभिनेत्री मोना सिंहने जस्सीच्या भूमिकेतून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. जस्सीच्या भूमिकेने मोनाला ओळख दिली. या मालिकेत जस्सी आणि अपूर्वची जोडी हिट ठरली होती.

आता जस्सी अर्थात मोना आणि अपूर्व पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. तब्बल १२ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र काम करतेय. एकता कपूरच्या वेबसीरिजमध्ये ही जोडी दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मोनासोबत 'जस्सी जैसी कोई नही'मधील जस्सीचा सह अभिनेता अपूर्व अग्निहोत्रीसोबत दिसणार आहे.

मोना एकता कपूरच्या 'कहने को हमसफर है' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. १२ वर्षानंतर पुन्हा एकदा मोना आणि अपूर्वची जोडी दिसणार आहे. बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार एकता कपूरच्या या वेब सीरिजमध्ये अपूर्व पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'कहने को हमसफर है' मध्ये रोनित रॉय आणि गुरदीप कोहली पती आणि पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मोना सिंह अन्नया मेहराच्या भूमिकेत असेल. या शोची कहाणी अनैतिक संबंधांवर आधारित आहे. 

'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेतील मोना आणि अपूर्वच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यानंतर मोनाने क्या हुआ तेरा वादा, इतना करो ना मुझे प्यार, कवच यासारख्या मालिकेत दिसली होती.

Read More