Marathi News> मनोरंजन
Advertisement

24 वर्षांनंतर समोर आला 'नायक' चित्रपटातील धमाकेदार अ‍ॅक्शन सीन; चिखलात माखलेले अनिल कपूर पाहून चाहते थक्क

सुपरहिट चित्रपट 'नायक'मुळे अनिल कपूर यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. या चित्रपटात राणी मुखर्जीने अनिल कपूरसोबत दमदार भूमिका साकारली होती. सध्या या चित्रपटातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.पाहूयात या चित्रपटाचा BTS व्हिडीओ.  

24 वर्षांनंतर समोर आला 'नायक' चित्रपटातील धमाकेदार अ‍ॅक्शन सीन; चिखलात माखलेले अनिल कपूर पाहून चाहते थक्क

Nayak: 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नायक - द रिअल हिरो' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये नवीन विचारांची लाट आणली. एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर यांनी पत्रकार शिवाजीरावची भूमिका साकारली होती, जो एका दिवसासाठी राज्याचा मुख्यमंत्री बनतो. त्यांची भूमिका आजही लोकांच्या लक्षात राहिली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी, अमरीश पुरी आणि परेश रावल यांच्याही लक्षवेधी भूमिका होत्या. 'नायक' हा केवळ एक राजकीय चित्रपट नव्हता, तर त्यात भरपूर अ‍ॅक्शन, भावना, सामाजिक संदेश आणि सामान्य माणसाचा संघर्ष दाखवला होता.

चिखलात माखलेला अ‍ॅक्शन सीन पुन्हा चर्चेत
चित्रपटातील सर्वात डोळ्यात भरणारा सीन म्हणजे अनिल कपूरवर झालेला गुंडांचा हल्ला आणि त्यानंतरचा त्यांचा संताप. या सीनमध्ये अनिल कपूर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला जातो. कपडे फाडले जातात, शरीरावर मार बसतो. ते जमिनीवर कोसळतात, चिखलात लोळतात.मात्र, त्यानंतर ते गुंडांवर जसे वादळासारखे तुटून पडतात.हा सीन इतका प्रभावशाली होता की अनेक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद दिली होती. तो फक्त एक अ‍ॅक्शन सीन नव्हता, तर अन्यायाविरोधातील एक प्रतीकात्मक लढा होता.

व्हिडीओमध्ये दिसतोय सीनमागचा संघर्ष
सध्या या सीनचा बीटीएस व्हिडीओ (Behind The Scenes) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की शूटिंगसाठी अनिल कपूर यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर कसकसा चिखल लावण्यात येतो आहे. त्यांच्या शरीरावर हा नैसर्गिक चिखलाचा लूक यावा म्हणून मेकअप टीमने अचूक मेकअप केला. शंकर यांच्या सारख्या परिपूर्ण दिग्दर्शकासाठी हे दृश्य केवळ मारामारीचे नव्हते, तर ते सामाजिक उद्रेकाचे प्रतीक होते. या सीनसाठी त्यांनी विशेष सेट, कृत्रिम पाऊस, जमिनीवर माती आणि विविध कॅमेरऱ्याचे अँगल तयार केले होते.

हे ही वाचा: 45 कोटींचं बजेट असणाऱ्या 'सैयारा'ची पहिल्याच दिवशी मोठी कमाई, अहान पांडेचा पहिलाच चित्रपट ठरणार सुपरहिट!

'नायक' चित्रपट आजही जिवंत
'नायक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. या चित्रपटाचा खरा प्रभाव त्याच्या कथेत होता. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाने राजकीय चर्चेलाही वळण दिले होते. एका सामान्य व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध उभं राहण्याचं स्वप्न या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. आज, 24 वर्षांनंतरही या चित्रपटातील दृश्ये, संवाद आणि गाणी लोकांच्या स्मरणात आहेत आणि जेव्हा असा अ‍ॅक्शन सीन पुन्हा समोर येतो, तेव्हा जुन्या आठवणी जाग्या होतात.

Read More