Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्याच्या गरोदरपणाच्या चर्चेनंतर बच्चन कुटुंबात चिमुकल्या पावलांची एन्ट्री

बच्चन कुटुंबात तान्हुल्याचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे. 

ऐश्वर्याच्या गरोदरपणाच्या चर्चेनंतर बच्चन कुटुंबात चिमुकल्या पावलांची एन्ट्री

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांची सून, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या गरोदरपणाच्या चर्चांनी कमालीचा जोर धरला. ऐश्वर्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता दुसरीकडे बच्चन कुटुंबात तान्हुल्याचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे. 

बच्चन कुटंबातील या गोड बातमीमुळं सध्या अनेकांनीच या नव्या सदस्याच्या येण्याबाबत शुभेच्छाही दिल्या आहेत. 

आता तुम्ही म्हणाल, बच्चन कुटुंबात बाळ आलंय खरं पण, ते कुणाचं? ऐश्वर्याच्या बाबत तर फक्त चर्चाच समोर आल्या आणि आता लगेच बाळाची बातमी? 

अनेक प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर त्यांना आताच ब्रेक लावा. कारण हे बाळ बच्चन कुटुंबात आलं असलं तरीही ते अमिताभ बच्चन यांच्या सुनेचं नाही. 

तर, बिग बींचा धाकटा भाऊ अजिताभ बच्चन यांच्या मुलीला म्हणजेच अभिनेता कुणाल कपूर याच्या पत्नीनं नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे. 

लग्नानंतर तब्बल 8 वर्षांनी या जोडीच्या नात्यात बाळाच्या येण्यानं आनंदाच्या अविरत क्षणांची उधळण होत आहे. 

कुणालनं सोशल मीडिया पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत आणली. ‘आमच्या सर्व हितचिंतकांसाठी... नैना आणि मला हे सांगण्यात अतिशय आनंद होतोय की, आम्ही एका मुलाचे पालक झालो आहोत. या आशीर्वादासाठी आम्ही परमेश्वराचे ऋणी आहोत’, असं कुणालनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं. 

 <

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kunal Kapoor (@kunalkkapoor)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kunal Kapoor (@kunalkkapoor)

एका सुरेख नात्यात एका सुरेख आणि तितक्याच खास पाहुण्याची एंट्री झाल्याचं कळताच चाहत्यांनीही कुणाल आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 

Read More