Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्या न्यूयॉर्कवरून परतताच अभिषेकनं सोडला देश; कुठे पोहोचला अभिनेता? घटस्फोटावर नेटकरी म्हणाले...

Abhishek Bachchan : ऐश्वर्या येताच या देशात गेला अभिषेक बच्चन... एकट्याला पाहताच नेटकऱ्यांनी केले प्रश्न

ऐश्वर्या न्यूयॉर्कवरून परतताच अभिषेकनं सोडला देश; कुठे पोहोचला अभिनेता? घटस्फोटावर नेटकरी म्हणाले...

Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात सगळं काही ठीक नसल्याचं म्हटलं जातं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या. मात्र, यावर ना बच्चन कुटुंबानं काही प्रतिक्रिया दिली ना त्या दोघांनी. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये  अभिषेक बच्चन हा पॅरिस ओलम्पिक 2024 चा आनंद घेताना दिसल्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

अभिषेक बच्चननं सिग्नेचर पिवळ्या रंगाची अशी फ्रेम घातली आणि त्यानं स्वत: चा लूक पूर्ण केला आहे. एका फोटोत तो हसत थम्ब्ज अप करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो टाळी वाजवताना दिसत आहे. याशिवाय त्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या फोटोत अभिषेकनं लाल रंगाची फ्रेम घातली आहे. त्याशिवाय त्यानं हातात तिरंगा धरला आहे. त्याच्या या व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून एक गोष्ट स्पष्ट होते की तो ओलम्पिकचा खूप आनंद घेत आहे. मात्र, सगळ्यांचं लक्ष कोणत्या गोष्टीनं वेधलं असेल तर ते ऐश्वर्या राय आणि आराध्याची अनुपस्थिती आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

खरंतर अभिषेकनं तिरंगा धरून जो फोटो शेअर केला आहे. त्याला त्यानं कॅप्शन दिलं की “रिप्रेझेंट!! हॅशटॅग जय हिंद, हॅश टॅग कम ऑन इंडिया.” अभिषेकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्याला ऐश्वर्या विषयी प्रश्न विचारले आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'ऐश्वर्या कुठे आहे?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला आशा आहे की तुझ्यात आणि ऐश्वर्यामध्ये सगळं काही ठीक आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बाबो, घटस्फोट होणार असं वाटतंय, पण हे खरंच आहे का? कृपया याविषयी थोडी माहिती द्याल.'

दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन ही लेक आराध्यासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. त्या आधी ती लेक आराध्यासोबत न्यूयॉर्कला ट्रिपवर गेली होती. तिनं पापाराझींसाठी लेकीसोबत पोज देखील दिले. त्यानंतर आता अभिषेक हा पॅरिसला ओलम्पिक पाहण्यासाठी रवाना झाला. 

हेही वाचा : 'लैंगिक हिंसेच्या सीननंतर झोप उडाली, उलट्या झाल्या...'; अभिनेत्याचा मोठा खुलासा

खरंतर ऐश्वर्या आणि अभिषेकच्या विभक्त होण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती. काही दिवसांपूर्वी असं देखील म्हटलं जात होतं की ती आता बच्चन कुटुंबासोबत राहत नसून तिच्या आईसोबत राहते. 

Read More