Marathi News> मनोरंजन
Advertisement

'एक वेडा आहे, तोच होईल बाजीगर!' सलमान, अक्षयच्या नकारानंतर शाहरुखला असा मिळाला चित्रपट!

Shah Rukh Khan Baazigar Movie : शाहरुख खानला 'बाजीगर' चित्रपट कसा मिळाला? तर होकार देण्याआधी निर्मात्यांसमोर ठेवली ही अट

'एक वेडा आहे, तोच होईल बाजीगर!' सलमान, अक्षयच्या नकारानंतर शाहरुखला असा मिळाला चित्रपट!

Shah Rukh Khan Baazigar Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्याच्या करिअरमधील 'बाजीगर' हा चित्रपट काही वेगळा होता. या चित्रपटात शाहरुखनं महत्त्वाची भूमिका आणि खलनायक अजय शर्माची भूमिका साकारली होती. त्यानं या चित्रपटात केलेला अनुभव हा त्याच्या करिअरमध्ये बेस्ट होता. पण तुम्हाला माहित आहे की चित्रपटात दिग्दर्शक अब्बास मस्तान हे शाहरुख खान आधी सलमान खान आणि अक्षय कुमार यांना कास्ट करण्याचा विचार सुरु होता? पण त्या दोघांनी याला नकार दिला होता. याविषयी लेखक रॉबिन भट्ट जे दिग्दर्शक महेश भट्ट यांचे सावत्र भाऊ आहेत, त्यांनी किस्सा सांगितला आहे. 

रॉबिन भट्ट यांनी फ्रायडे टॉकीजला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, " 'बाजीगर'मध्ये एक अडचन होती की हीरोच खलनायक आहे आणि खलनायकच हीरो आहे. आम्ही चित्रपटाची पटकथा तर लिहिली पण अडचन ही होती की कोण भूमिका साकारणार. अब्बास मस्ताननं आधी अक्षय कुमारसोबत काम केलं. पण त्यानं काम करण्यास नकार दिला. मग मी सलीम खान साहेब यांच्याशी बोललो की मी एक चित्रपट लिहिला आहे आणि मला त्यात सलमान हवा आहे. त्यांनी मला विचारलं की सलमाननं हा चित्रपट का करावा?"

रॉबिन भट्ट पुढे याविषयी सांगत म्हणाले की "त्यांनी सगळ्या कलाकारांनंतर निर्मात्यांशी शाहरुख खानविषयी चर्चा केली. हा चित्रपट करण्यासाठी तो तयार तर झाला होता. तर याविषयी सांगत ते म्हणाले, सगळ्यांनी भूमिका करण्यास नकार दिला. मग मी म्हणालो की एक पागल आहे शाहरुख खान जो ही भूमिका साकारू शकतो. शाहरुखसोबत माझं नातं असं होतं की तो अनेकदा मला भेटायला यायचा."

पुढे याविषयी सविस्तर सांगत रॉबिन भट्ट म्हणाले, "जेव्हा तो बोलायचा तेव्हा तो सगळ्यांपासून थोडा वेगळा आहे असं मला वाटायचं. त्याचे विचार थोडे वेगळे आहेत. त्यामुळे मग मी त्याला बोलावलं आणि बाजीगरची पटकथा ऐकली, त्यांनी मला फक्त इंटरव्हलमध्ये थांबवलं आणि सांगितलं की सर मी हा चित्रपट करतोय. मी त्याला सावधान करत म्हटलं की आधी संपूर्ण पटकथा ऐकून घे. पण त्यानं म्हटलं की नाही मला कळलंय आणि मला हा चित्रपट करायचा आहे. मला दिग्दर्शकांना भेटायचं आहे."

निर्मात्यांना भेटल्यावर शाहरुखनं ठेवली 'ही' अट

निर्मात्यांना भेटल्यावर शाहरुख खाननं काय सांगितलं याविषयी बोलताना रॉबिन भट्ट म्हणाले, "तो निर्मात्यांना भेटला आणि त्यांनं त्यांच्या समोर एक अट ठेवली की जशी ही भूमिका लिहिली आहे, जर ती तशीच राहिली तरच तो हा चित्रपट करेल. तुम्ही त्यांच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करणार नाही. भूमिकेला अजून वाईट बनवणार नाही किंवा चांगलं दाखवणार नाही किंवा तसा काही प्रयत्न देखील करणार नाही. जर तुम्ही ही रिस्क घेण्यासाठी तयार असाल तर मी चित्रपटात काम करेन."

Read More