Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan Khan च्या जामीनानंतर AbRam चं अनोखं सेलिब्रेशन

 उद्या किंवा परवा त्यांची जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे. 

 Aryan Khan च्या जामीनानंतर AbRam चं अनोखं सेलिब्रेशन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे, उद्या किंवा परवा त्यांची जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 25 दिवसांनंतर आर्यन खान घरी परतणार आहे. याचा आनंद मन्नतवर पाहायला मिळत आहे. 

मुलाची सुटका झाल्याने शाहरुख खानने देखील सुटकेचा श्वास सोडला आहे. त्यासोबत मन्नतवर फटाकेबाजी करत सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.

शाहरुखचा मुलगा अबरामने मन्नातच्या टॉप फॉलोवर येत सगळ्यांना हात दाखवत आपला आनंद व्यक्त केला असं बोललं जात आहे. त्याची काही दृश्य समोर आली आहेत. शाहरुखचा तिसरा मुलगा अबरामचा जन्म सरोगरी द्वारे झाला आहे. शाहरुख बऱ्याचदा अबरामसोबत फोटो शेअर करताना दिसतो. 

fallbacks

शाहरुखसह अनेकांनाच मोठा दिलासा मिळाला. सलग तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यादरम्यान विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद मांडण्यात आला. ज्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर जामीन मंजूर केला. 

fallbacks

एनसीबीनं, सदर प्रकरण हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा युक्तिवाद केला होता. पण, अखेर आर्यन खानसह इतर दोघांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

 

 

Read More