Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan Khan Bail : आर्यनला जामीन मिळताच बहिणीकडून अवघ्या तीन शब्दात भावना व्यक्त

आर्यन खानला गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Aryan Khan Bail : आर्यनला जामीन मिळताच बहिणीकडून अवघ्या तीन शब्दात भावना व्यक्त

मुंबई : सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला गुरूवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तीन आठवड्यानंतर आर्यन आज शुक्रवारी कारागृहातून बाहेर पडणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर खान कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 23 वर्षीय आर्यन खानची लहान बहिण सुहाना खानने भावाच्या सुटकेनंतर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सुहानाने आपली भावना व्यक्त केली आहे. 

सुहाना खानने यावेळी वडिल शाहरूख खान आणि भाऊ आर्यन खान यांचा लहानपणीचा फोटो कोलाज करून शेअर केला आहे. या कोलाजसोबत तिने 'आय लव यू' असा मॅसेज लिहिला आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सविस्तर आदेश दिल्यामुळे आर्यन खानची शुक्रवारी किंवा शनिवारी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका होऊ शकते. आर्यन खानची बाजू मांडणारे माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मुंबईतील न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले की, "न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे आणि तीन याचिकाकर्ते शुक्रवारी किंवा शनिवारी तुरुंगातून बाहेर येतील अशी अपेक्षा आहे."

2 ऑक्टोबर रोजी जहाजावर एनसीबीच्या छाप्यात अटक करण्यात आलेल्या अनेकांपैकी शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान एक होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या छापेमारी करणाऱ्या केंद्रीय संस्थेने आरोप केला आहे की आर्यन खान नियमितपणे ड्रग्ज सेवन करत होता आणि ड्रग्जचा पुरवठाही करत होता.

अभिनेत्याच्या मुलाने हे आरोप फेटाळले आहेत, आर्यन खानच्या वकिलाच्या वतीने कोर्टात असा युक्तिवाद करण्यात आला आहे की छाप्यादरम्यान त्याच्याकडून ड्रग्ज सापडले नाहीत किंवा तो ड्रग्ज सेवन करत होता. त्याच्याकडे ड्रग्जसाठीही पैसे नव्हते.

Read More