Marathi News> मनोरंजन
Advertisement

आई झाल्यानंतर दीपिका पदुकोणचे बदलले आयुष्य, इन्स्टाच्या बायोमध्ये केला मोठा बदल

रणवीर सिंगसोबत तिच्या पहिल्या मुलीचे स्वागत केल्यानंतर दीपिका पदुकोणचे आयुष्य बदलले आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाच्या बायोमध्ये बदल करत तिच्या आई झाल्यानंतरच्या आयुष्याचे अपडेट दिले आहे. 

आई झाल्यानंतर दीपिका पदुकोणचे बदलले आयुष्य, इन्स्टाच्या बायोमध्ये केला मोठा बदल

Deepika Padukone Updates her Insta Bio: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 8 सप्टेंबर रोजी दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ज्याची माहिती रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामवर दिली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टा बायोमध्ये बदल केला आहे. 

दीपिकाने तिच्या इन्स्टा बायोमध्ये बदल केला आहे. त्याचबरोबर तिने मातृत्वाबाबत नवीन अपडेट दिले आहे. बाळाच्या जन्मानंतर तिच्या आयुष्यात मोठा बदल झाल्याच समजताच तिने तिच्या इन्स्टा बायो अपडेट केला आहे. त्यानंतर चाहते देखील तिने नेमका काय बदल केला आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 

दीपिकाने केला इन्स्टाच्या बायोमध्ये बदल

आई झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिच्या इन्स्टा बायोमध्ये बदल केला आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की,  'फीड, बर्प, स्लीप, रिपीट.' ज्याचा अर्थ असा होती की, खा, ढेकर द्या आणि झोपा. हेच सतत करत राहा. मुलीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोणचे आयुष्य असे झाले आहे. म्हणून तिने तिच्या इन्स्टा बायोमध्ये अपडेट केले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दीपिका सध्या तिच्या बाळाची काळजी घेत आहे. तिची अवस्था तिच्या इन्स्टा बायोसारखी झाली आहे. जी प्रसूतीनंतर प्रत्येक आईची झालेली असते. मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्रीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ती आपल्या करिअरमधून ब्रेक घेत आपल्या मुलीसोबत वेळ घालवणार आहे. अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दीपिका पदुकोणचा व्हिडीओ व्हायरल 

डिलिव्हरीनंतर दीपिका पदुकोण रणवीरसोबत मुलीला घेऊन घरी पोहोचली आहे. ती तिच्या मुलीला मांडीवर घेऊन कारमध्ये बसलेली दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दीपिकाची मुलीची पहिली झलक दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Read More