Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर Dhanush-Aishwaryaa पुन्हा एकत्र, 'तो' फोटो व्हायरल होताच...

18 वर्षांचा संसार मोडत विभक्त झालेले  Dhanush-Aishwaryaa पुन्हा दिसले एकत्र   

घटस्फोटानंतर Dhanush-Aishwaryaa पुन्हा एकत्र, 'तो' फोटो व्हायरल होताच...

मुंबई : साऊथचे प्रसिद्ध कलाकार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत (Dhanush-Aishwaryaa) घटस्फोटानंतर पुन्हा चर्चेत आले आहेत. घटस्फोटानंतर दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुषने जानेवारी महिन्यात घटस्फोट घेत नात्याला पूर्णविराम दिला. ऐश्वर्या आणि धनुषला दोन मुलं आहे. यात्रा आणि लिंगा अशी त्यांच्या दोन मुलांची नावे आहेत. एकमताने विभक्त झालेलं हे कपल मोठ्या मुलामुळे पुन्हा एकत्र आले आहे. 

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा मोठा मुलगा यात्रेच्या शाळेच्या कार्यक्रमात पोहोचले होते. दोघेही मुलासोबत पोज देताना दिसले. याशिवाय ऐश्वर्याने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या मुलाचे फोटो काढताना दिसत आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

fallbacks

मुलाचे फोटो पोस्ट करत ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये, 'दिवसाची चांगली सुरुवात... सोमवारी शाळेत एका कार्यक्रमात उपस्थितीत होती... जेथे माझ्या मोठ्या मुलाने क्रीडा कर्णधार म्हणून शपथ घेतली...' अलं लिहिलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऐश्वर्याच्या पोस्टवर फक्त सेलिब्रिटींनी नाही तर, चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एवढंच नाही सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये धनुष आणि ऐश्वर्या दोन मुलांसोबत एकत्र पोज देताना दिसत आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या आणि धनुष विभक्त झाले असले तरी मुलांसाठी एकत्र येतात.  धनुष यानं त्याची पत्नी, ऐश्वर्या रजनीकांत हिच्यासोबतचं आपलं वैवाहिक नातं संपुष्टात आल्याची माहिती जाहीर केली. एका पत्रकाच्या माध्यमातून धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही आपण 18 वर्षांचा संसार मोडत असल्याचं सांगितलं.

 

Read More