Marathi News> मनोरंजन
Advertisement

रजनीकांत यांच्या मुलीला घटस्फोट दिल्यानंतर धनुष दिसला खास व्यक्तीसोबत

घटस्फोटानंतर धनुषसोबत ती खास व्यक्ती कोण? फोटोची सर्वत्र चर्चा  

रजनीकांत यांच्या मुलीला घटस्फोट दिल्यानंतर धनुष दिसला खास व्यक्तीसोबत

मुंबई : साऊथचा सुपरस्टार धनुष 'कोलाव्हरी डी...' गाण्यामुळे तुफान चर्चेत आला. दाक्षिणात्य सिनेमांशिवाय त्याने बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून धनुष त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनुष यानं त्याची पत्नी, ऐश्वर्या रजनीकांत हिच्यासोबतचं आपलं वैवाहिक नातं संपुष्टात आल्याची माहिती जाहीर केली.

एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून धनुष आणि ऐश्वर्या दोघांनीही आपण 18 वर्षांचा संसार मोडत असल्याचं सांगितलं. घटस्फोटानंतर धनुषने पहिल्यांदा सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

फोटोमध्ये धनुष मुलासोबत दिसत आहे. फोटोमध्ये दोघे आनंदी दिसत आहेत. मुलासोबत फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'याआधी मी असं पाहिलं नाही...' असं लिहीलं. 

घटस्फोटानंतर धनुषने केलेली पहिली पोस्ट असल्यामुळे तुफान चर्चेत आहे. अतिशय अनपेक्षितपणे या जोडप्याने विभक्त होण्याचा त्यांचा निर्णय सांगितला. ज्यानंतर अनेकांनाच हादरा बसला. 

Read More