Marathi News> मनोरंजन
Advertisement

Anant-Radhika Wedding Video : आदित्य ठाकरेंशी हॅण्डशेक अन् पुढल्या क्षणी 'या' व्यक्तीच्या पाया पडला शाहरुख खान

Shahrukh Khan Video From Anant-Radhika Wedding : शाहरुख खानच्या त्या व्हिडीओनं जिंकली प्रेक्षकांची मनं

Anant-Radhika Wedding Video : आदित्य ठाकरेंशी हॅण्डशेक अन् पुढल्या क्षणी 'या' व्यक्तीच्या पाया पडला शाहरुख खान

Shahrukh Khan Video From Anant-Radhika Wedding : बॉलिवूडतचा किंग खान म्हणजेच अर्थात अभिनेता शाहरुख खाननं अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात हजेरी लावली होती. तिथले त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यापैकी एक व्हिडीओ हा बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा देखील आहे. यावेळी शाहरुखनं अमिताभ आणि जया बच्चन यांना पाहताच केलेल्या त्या कृतीची सगळीकडे स्तुती होते. 

खरंतर अंबानींच्या कुटुंबात सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान देखील यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत तिथे पोहोचला होता. तर अमिताभ आणि जया यांच्यासोबतचा त्याचा एक व्हिडीओ आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत शाहरुख कितीही मोठा स्टार असला तरी स्वत: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी देखील हात जोडून विनंम्रतेनं त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांच्याच शेजारी असलेल्या आदित्य ठाकरे यांच्याशी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी देखील त्यानं हात मिळवला आणि गप्पा मारल्या. पुढे देखील तो काही पाहुण्यांना हात जोडून त्यांचा आदर करत असल्याचं दाखवत होता.यानंतर शाहरुख हा अमिताभ आणि जया यांना पाहताच त्यांचा आशीर्वाद घेताना दिसतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शाहरुखनं केलेल्या या कृतीची सगळीकडे स्तुती सुरु आहे. शाहरुखचे फक्त भारतात नाही तर परदेशात देखील लाखो चाहते आहेत. अशात त्याच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून नक्कीच शिकायला मिळेल. याशिवाय शाहरुखनं अंबानींच्या लग्नात सलमान खानसोबत त्यांच्या फेमस ट्रॅक भांडगा पालेवर डान्स देखील केला. त्यामुळे चाहत्यांना आणखी आनंद झाला. 

हेही वाचा : अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा

शाहरुखच्या स्टायलिंगविषयी बोलायचे झाले तर लग्नात शाहरुखनं पत्नी गौरी खानसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं ऑलिव्ह ग्रीन इंडो-वेस्टर्न आउटफिट परिधान केला होता. त्याशिवाय एविएटर्स आणि स्टायलिश नेकपीसनं त्यानं स्वत: ला स्टाईल केलं होतं. तर अंबानींच्या कार्यक्रमात अनेक हायप्रोफाईल पाहुण्यांनी हजेरी लावली होती. त्यात किम कर्दाशियन, जॉन सीना, निक जोनस आणि प्रियांका चोप्रासोबत अनेक हॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली होती. बॉलिवूडविषयी बोलायचे झाले तर कतरिना कैफ, विकी कौशल, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याशिवाय क्रिकेट विश्वावातून अनेकांनी हजेरी लावली होती. तरी देखील सगळ्यात जास्त चर्चा ही शाहरुख खानची सुरु होती.

Read More