Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ekta Kapoor आज असती प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी; पण 'त्या' क्षणानंतर...

'या' अभिनेत्यामुळे एकता एकटी..., तो जगतोय सुखी आयुष्य, पण ती मात्र 'सिंगल मदर'  

Ekta Kapoor आज असती प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी; पण 'त्या' क्षणानंतर...

मुंबई : टीव्ही क्विन एकता कपूरने (Ekta Kapoor) स्वतःच्या बळावर कलाविश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण आजही लोकांना एक प्रश्न पडतो एकताने अद्यापही लग्न का केलं नाही? आता एकता कपूरने वयाच्या 47 व्या वर्षी एका व्यक्तीबद्दल कबुली दिली आहे. एकताला बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न करायचं होतं, परंतु त्या अभिनेत्याने एकताची मागणी मान्य केली नाही. विशेष म्हणजे हा अभिनेता दुसरा कोणी नसून चंकी पांडे आहे (Chunky Panday).

चंकी पांडेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकताने (Ekta Kapoor Chunky Pandey relation) त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून चंकीसोबत एक फोटो पोस्ट करत एकता म्हणते, 'अनेक वर्षांपूर्वी मी चंकी पांडेला लग्नासाठी विचारलं होतं, जर तेव्हा त्याने होकार दिला असता, तर मी आज 'बॉलीवुड वाइफ' असती.' एकताची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Ekta Kapoor confession)

fallbacks

एवढंच नाही तर, चंकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एकताने अनेक इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत. पण या पोस्टमधून एकताने अनेक वर्षांनंतर मोठा खुलाला केला आहे. 

सिंगल मदर आहे एकता कपूर (single mother Ekta Kapoor)
एकता कपूर सध्या मुलगा रवीसोबत जीवन एन्जॉय करत आहे. एकता कपूर आणि तिच्या मालिका घराघरात प्रसिद्ध आहेत. तर आता एकता कपूरचे वेब कंटेंट देखील प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे.

चंकी पांडेचं कुटुंब (Chunky Panday Family)
गेल्या अनेक वर्षांपासून चंकी पांडे रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण चंकीची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे बॉलिवूडवर राज्य करत आहे. फार कमी कालावधीत तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक स्थान पक्क केलं आहे. चंकीने 1998 साली भावना पांडेसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत. 

Read More