Marathi News> मनोरंजन
Advertisement

Raj Kundra Case : पतीच्या कारनाम्यामुळे शिल्पा शेट्टीला लाखोंचा फटका

एकीकडे राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Raj Kundra Case : पतीच्या कारनाम्यामुळे शिल्पा शेट्टीला लाखोंचा फटका

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे तुरुंगात आहेत. अशा परिस्थितीत शिल्पाला देखील एकामागोमाग एक येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. SEBI ने  शिल्पा शेट्टीवर 3 लाखांचा दंड ठोठावला आहे. 

राज कुंद्रा आणि त्याची कंपनी वियान इंडस्ट्रीज यांना SEBI कडून  नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

एकीकडे राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इकडे Securities and Exchange Board of India ने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर कारवाई केली आहे.

राज कुंद्रा आणि त्याची कंपनी वियान इंडस्ट्रीजच्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिल्पावर दंड लादला गेला आहे. त्यामुळे आता शिल्पा शेट्टी आणखी एका अडचणीमध्ये फसली आहे.

राज कुंद्रा तुरूंगात 

मंगळवारी कोर्टाने राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. आता मुंबई न्यायालयात राजच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली आहे. या सुनावणीत राज याला मोठा झटका बसला आहे. राज कुंद्राचा जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे. 

 

Read More